नांदेड जिल्ह्यातील कलावंतांसह निर्माताही नांदेडचाच
नांदेड| मराठी चित्रपट सृष्टीत आता मराठवाडा आणि नांदेड जिल्ह्याचे नाव ठळकपणे घेतले जाऊ लागले आहे. एका मागून एक सरस मराठी चित्रपटाची निर्मिती नांदेड जिल्ह्यात होत आहे . निर्माते ओम प्रकाश बुक्कावार आणि राजकुमार देगलूरकर आणि दिग्दर्शक सूर्या यांचा ' ती माझी प्रेम कथा ' हा चित्रपट उद्या दिनांक 14 ऑक्टोबर रोजी नांदेडसह महाराष्ट्रातील पंचवीस थेटर मध्ये झळकला आहे. अशी माहिती निर्माते राजकुमार देगलूरकर आणि दिग्दर्शक सूर्या यांनी दिली.
संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन बघावा अशा सामाजिक आशयाची प्रेम कथा असणारा ' ती माझी प्रेम कथा ' हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरणार आहे. चित्रपटाचे कथानक सत्य घटनेवर आधारित असल्याने चित्रपटात प्रेमासह अनेक बाबींचा उलगडा होणार आहे. मैत्री , प्रेम , जिव्हाळा यासोबतच या चित्रपटात प्रेमाचे होणारे साईड इफेक्ट दाखवण्यात आले आहेत. अलीकडच्या काळातील युवा पिढी प्रेमाच्या गोंडस नावाखाली ज्या पद्धतीने भरकटत आहेत. स्वतःचे करिअर उध्वस्त करून घेत आहेत या सर्व बाबींना पडद्यावर पाहणे महत्त्वाचे ठरते. तुषार धकीते आणि पद्मिनी कांबळे यांनी या चित्रपटात नायक आणि नायकेची प्रमुख भूमिका साकारली असून नांदेडचा गुणी कलावंत कपिल गुडसुरकर या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येणार आहे.
माया भद्रे, डॉक्टर माया बुरुळकर, अनुराधा पत्की, सुरेखा पाटणी, विजय राखे, गोविंद जोशी हे नांदेडचे कलावंतही रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. चित्रपटाची गाणी आणि संगीत हिंगोलीच्या राजवीर गांगजी यांची असून संवाद लेखन नांदेडच्या आशिष पवार आणि नितीन सूर्यवंशी यांनी केले आहे. विशेष बाब ही की, या चित्रपटातील सर्वच गाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे ,आदर्श शिंदे , प्रसेनांजित कोसंबी, चिन्मय श्रीपदा, आनंदी जोशी ,शुभम कांबळे यांनी गायिली आहे.
मराठी प्रेक्षकांसाठी नितळ करमणुकीसह कौटुंबिक आणि सामाजिक संदेश देणारा 'ती माझी प्रेम कथा' चित्रपट निश्चितपणे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल असा विश्वासही निर्माता आणि दिग्दर्शक आणि यावेळी व्यक्त केला.