हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सिरंजनी परिसरातील ११३ शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी भारतीय स्टेट बैंकेच्या शाखेत प्रस्ताव दाखल केला आहेत. यास ४ महिन्याचा कालावधी झाला केवळ १७ जणांचे प्रस्ताव मंजूर करून उर्वरित शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित ठेवले जात आहे. त्या उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सिरंजनीच्या सरपंच सौ.मेघा पवन करेवाड यांनी निवेदन देऊन केली आहे.
यावर्षी खरीप हानगमात अतिवृष्टीने पिकाचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कृषी कर्जसाठी शेतकऱ्यांनी जून महिन्यात कर्जासाठी प्रस्ताव दखल केले, मात्र बहुतांश शेतकरी अजूनही कृषी कर्ज मिळाले नसल्याने बैंकेच्या चकरा मारत आहेत. बैंकेवर कामाचा लोड जास्त आहे, हे ह्मणाला माहित आहे. मात्र कृषी कर्जाला ४ महिन्यापासून विलंब होणे हि गंभीर बाब आहे. आता रब्बीचा हनगं सुरु होण्याच्या मार्गावर आहे, किमान यावेळी तरी हे कर्ज मिळाल्यास शेतकऱ्यांना रब्बीची पेरणी करण्यासाठी सोईचे होईल. आणि शेतकरी खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी यामुळे संधी मिळेल. त्यासाठी आठ दिवसात शेतकऱ्यांना कृषी कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सिरंजनी येथील महिला सरपंच सौ.मेघा पवन करेवाड यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी भारतीय स्टेट बैंकेचे शाखाधिकारी याना दिले असून, यावेळी सिरंजनी भागातील शेतकरी, नागरिक उपस्थित होते.