नांदेड| तेलगू भाषिकांचा आवडता सण असलेला बदकम्मा या सणानिमित्त भाजपा महानगरच्या वतीने धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व अनिल गाजूला यांनी आयोजित केलेल्या भव्य बदकम्मा स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अकरा विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात आली.
पुरातन काळापासून तेलुगु भाषिक महिला मोठ्या उत्साहाने सजवलेल्या फुलाची आरास तयार करून बदकम्मा हा उत्सव साजरा करतात. नवरात्रातील पूजा संपल्यानंतर गोदावरी मध्ये विसर्जन करण्यात येते. घराघरातून आलेल्या बदकम्मा एकत्रित ठेवून त्याच्या भोवती फेर धरून महिला उत्साहाने नाचत असतात. भारतात पहिल्यांदाच दिलीप ठाकूर यांनी २००४ साली बदकम्मा स्पर्धेचे आयोजन केले होते. सतत बारा वर्ष आयोजन केल्यानंतर काही अपरिहार्य कारणास्तव या स्पर्धा भरवण्यात येत नव्हत्या.
कोरोना पर्व संपल्यामुळे यावर्षी पुन्हा या स्पर्धा घेण्यात आल्या. सुरुवातीला भाजपा दक्षिण भारतीय आघाडी जिल्हा संयोजक अनिल गाजूला यांनी सर्वांचे स्वागत केले. दिलीप ठाकूर यांनी या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केला. विजयी स्पर्धकांना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील धनेगावकर व व्यंकट मोकले, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष व्यंकटेश जिंदम यांच्या हस्ते रोख पारितोषिके वितरित करण्यात आली.
गौतमी बडगु, अनिता राजू तुम्मा, वजरम्मा शंकर रागम, विजयालक्ष्मी महेश गाजूला, रेखा कृष्णा शिवरात्री, व्यंकटलक्ष्मी सदानंद मुत्याला, बिमणपल्ली बिरलू या महिलांनी या स्पर्धेत बाजी मारली. कार्यक्रमाचे संचलन अनिल गाजूला यांनी तर आभार नरसिंह गुर्रम यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभुदास बत्तीन, सदानंद मुत्याला, सतीश वझरकर, अक्षय मारावार, ओम खैनी, किरण नक्का, श्रीनिवास शिवरात्री ,सतीश चिंता, श्रीकांत मासान यांनी परिश्रम घेतले. यापुढे दरवर्षी भव्य बदकम्मा स्पर्धा नियमित घेण्यात येणार असल्याची घोषणा दिलीप ठाकूर व अनिल गाजुला यांनी केली.