हरभरा बियाणेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत -NNL


नांदेड|
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य सन 2022-23 अंतर्गत रब्बी हंगामामध्ये हरभरा या पिकांचे अनुदानित दराने बियाणे वितरण (दहा वर्षा आतील वाण ) या घटकाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बीज निगम लि. कृषक भारती को ऑप या बियाणे वितरण संस्थेमार्फत‍ राबविण्यात येत आहे. या अनुदानावरील बियाण्याचा लाभ घेण्यासाठी 21 ऑक्टोबर 2022 महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. 

अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून कृषी सहाय्यक मार्फत परमिट देण्यात येत आहे. प्रमाणित बियाणे वितरण अंतर्गत शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य बियाणे, महामंडळ राष्ट्रीय बीज निगम व कृषक भारती को.ऑप यांच्या वितरकांकडे परमिट देऊन अनुदान वगळता उर्वरित रक्कम देऊन हरभरा बियाणे खरेदी करावे. 

या बियाणास 25 रूपये प्रती किलो अनुदान देण्यात येते.तसेच हरभरा ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत प्रती शेतकरी एक एकर मर्यादेत अनुदानावर बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे.यामध्ये 10 वर्षाआतील वाणास (राज विजय -202.फुले विक्रम.फुले विक्रांत, एकेजी -1109 पिडीकेव्ही कांचन बीजी -3062 पुसा पार्वती, बीजीएम-10216 पुसा ) रुपये 25 प्रती किलो व 10 वर्षावरील वाणास (जॉफी -9218 विशाल, दिग्विजय विजय, विराट) रूपये 20 प्रती किलो अनुदान वगळता उर्वरित रक्कम महाबीज वितरकाकडे देऊन खरेदी करावे. जिल्ह्यात कृषी विभागामार्फत हरभरा प्रमाणित बियाणे अंतर्गत 3202 क्विंटल बियाणे व हरभरा ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत 11919 क्विंटल बियाणे वाटप करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी