नांदेड| जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना 2022-23 अंतर्गत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प किनवट येथे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनासाठी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन शासकीय आश्रमशाळा येथे दिनांक 15 ते 17 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आले आहे.
यापूर्वी सारखणी, दुधड, बोधडी व उमरी या केंद्रावरील यशस्वी झालेले 1 हजार 7 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये 14,17 व 19 वर्ष या वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेमध्ये खो-खो, व्हॉलीबॉल, बॅटन रिले, व वैयक्तीक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्मराम धाबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.