नांदेड| उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नांदेड महानगरप्रमुखपदी झुंजार व धडाडीचे कार्यकर्ते प्रदीप (पप्पू) जाधव यांची नियुक्ती केल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केले आहे.
प्रदीप दगडू जाधव हे 1995 पासून शिवसेनेत आजतागायत कार्यरत आहेत. त्यांनी एकनिष्ठतेने गेल्या 26 ते 27 वर्षापासून शिवसेना बळकट करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केल्यानेच महानगरप्रमुखपदाची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोपवली आहे. यापूर्वी त्यांनी विभाग प्रमुख, शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख अशी पदे भोगली व त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपल्या संघटन कौशल्याच्या बळावर व शिवसैनिकांच्या सहकार्याने आजही सक्षमपणे काम करीत आहे.
जाधव यांनी सर्वात मोठी शिवजयंती काढली व तसेच शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळाही बसवला. इतकेच नाही तर अनेकदा आक्रमकपणे आंदोलने केली. मनपा आयुक्तांच्या दालनात कचरा फेकला, गुरु गोविंदसिंघ शासकीय रुग्णालयात स्वच्छतेची मोहीम राबवली, रक्तदान शिबीर, पुरग्रस्तांना मदत, कोरोना महामारीत गरजुंना अन्नदान वाटप केले. यासह विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग होता.