अर्धापूर, नीळकंठ मदने| येथील नगरपंचायत मध्ये नगरसेविकांच्या कारभारात पतीराज किंवा नगरसेवक प्रतिनिधींचा हस्तक्षेप वाढल्याने दस्तुरखुद्द नगरपंचायतचे मुख्याधीकारी यांनी एका नगरसेविकेला लेखी आदेश काढुन बनावट स्वाक्षरी असल्याचे सांगत कारणे दाखवा नोटीस काढल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून,एकावर एक नगरसेवक फ्री व नगरसेवक प्रतिनिधी यामुळे अधीकाऱ्यांना निर्णय घेण्यात अडचण येत असून,येथील प्रकाराकडे सबंधीतांनी लक्ष देण्याची गरज आहे.
अर्धापूर नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून ना.अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून काॅग्रेसची सता आहे. येथे विविध विभातून अशोकराव चव्हाण यांनी शहराच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून दिला असून,२८ कोटींची शुध्द पाणीपुरवठा योजना,बंदीस्त नालीसाठी ४२ कोटींचा निधी, काॅम्पलेक्स,तर बायपास ते बायपास रस्त्यासाठी १०० कोटी अशा अनेक निधी नवीन कार्यालये उभारली, उपलब्ध निधी योग्य पणे खर्च करा असे आदेश अशोकराव चव्हाण यांनी दिले आहेत. जबाबदार पदाधिकारी नगरपंचायत मध्ये लुडबुड करीत नाहीत. पण काही प्रतिनिधी हमेशा नगरपंचायत परीसरातच डेरा टाकतात, त्यामुळे मुळ सदस्य कर्तव्यापासून वंचीत राहतात,अनेक नगरसेवीका व नगरसेवकांचे नातलग प्रतिनिधींचा आव आणून नगरपंचायतच्या कामात नेहमी हस्तक्षेप करतात.
यामुळे नगरपंचायतचे मुख्याधीकारी शैलेष फडसे यांनी एका नगरसेवीकेला स्वाक्षऱ्या जुळून येत नाही, त्यामुळे कारणे दाखवा नोटीस काढली आहे. माजी आमदार अमीताभाभी चव्हाण यांनी ही महिला लोकप्रतिनिधीं कुठल्याही पक्षाची असो,त्याच महिलांनी कामात लक्ष देण्याची संकल्पना समोर ठेवली आहे. वरिष्ठ नेत्यांनाही महिला सक्षम झाल्या पाहिजेत असे वाटते. या गंभीर विषयी प्रतिनिधी काय भुमिका घेतात की येथे असाच कारभार चालेल याविषयी शहरवासीयांत चर्चेला उधाण आले आहे,याप्रकरणी सबंधीतांनी लक्ष देण्याची गरज आहे.