नांदेड| वीज दुरुस्ती विधेयकाला राज्य सरकारने विरोध करावा, तीन्ही कंपन्यांमध्ये सरळ सेवा पध्दतीने नौकर भरती करण्यात यावी, मागासवर्गीय अधिकारी व कर्मचार्यांचा अनुशेष तात्काळ भरण्यात यावा व अन्य मागण्यांसाठी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीने अण्णाभाऊ साठे चौकातील विद्युत भवन कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
तिन्ही कंपन्यातील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचार्यांच्या विरोधात अन्यायकारक धोरण राबविले जात आहेत. मागासवर्गीयांचा कंपन्यांमधील अनुशेष तात्काळ भरण्यात यावा, जनतेच्या व राज्याच्या विरोधात असलेले केंद्र शासनाच्या प्रस्तावित वीज दुरुस्ती विधेयकाला कडाडून विरोध करावा व कामगार कर्मचार्यांच्या ज्वलंत प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावे व अन्य मागण्यांसाठी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यात दि.11 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
अण्णाभाऊ साठे चौकातील विद्युत भवन समोर मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष सिद्धार्थ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे परिमंडळ अध्यक्ष शंकर घुले, प्रमोद क्षिरसागर, प्रमोद बुक्कावार, श्याम सोनटक्के, सूर्यकांत गोणारकर, विनायक ढवळे, बी.ए.मापारी, अविनाश खंदारे, के.एस.कांबळे, एस.एल.कांबळे, रामेश्वर कौठेकर, दीपक टोम्पे, रोहन राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.