मालेगाव/ नांदेड| मालेगाव ते अर्धापूर महामार्गावर उमरी पाटी जवळ दुचाकी घसरून विठ्ठल गायकवाड रा.गणपुर ता.अर्धापूर नावाचा तरूण आदळला त्याचा डोक्याला, हाताला, जबर मार लागला.
ही घटना एका वाटसरू ने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख सुभाशिष कामेवार यांना कळवली. क्षणार्धात सुभाशिष कामेवार त्यांचे सहकारी बंटी शेळके, स्वप्नील खंदारे सह घटनास्थळावर दाखल झाले. तरूणाला आधार देत महामार्ग रूग्नवाहीकेला बोलवून नांदेड येथील रूग्णालयात पाठवले. या वेळे पोलीस उपनिरीक्षक तोय्यब, पप्पु चव्हाण, लहानकर आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते