उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील हडको जवळील गोविंद गार्डन जवळ एक ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे पाचच्या दरम्यान डुकराला वाचवण्याच्या प्रयत्नात मोटरसायकल स्लीप होऊन पोखरभोसी येथील डॉक्टर अविनाश डांगे यांचा रोडवर जागीच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की, लोहा तालुक्यातील पोखरभोसी येथील डॉक्टर अविनाश विक्रम डांगे यांचे भोपळवाडी (कलंबर) येथे क्लिनिक असून, ते एक ऑक्टोबर रोजी पहाटे पाचच्या दरम्यान गावाकडून नांदेड कडे निघाले असता गोविंद गार्डन हडको जवळ डुक्कर मोटरसायकलच्या अचानक समोर आल्यामुळे डुकराला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांचा अपघात झाला व जागीच ठार झाले. डॉक्टर अविनाश डांगे यांचे वडील आजारी असल्यामुळे ते औरंगाबाद येथील दवाखान्यात उपचार चालू असल्यामुळे अविनाश डांगे हे गावाकडून घाई गडबडीत दि.१ ऑक्टोबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास मराठवाडा ( हायकोर्ट ) गाडी पकडण्यासाठी किवळा मार्गे नांदेड कडे जात होते.
एम.एच.२६ बी.आर.३१९४ या मोटरसायकल वरुन जात असताना हाडको जवळील गोविंद गार्डन जवळ येताच अचानक डुक्कर मोटरसायकलच्या समोर आल्यामुळे डुकराला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या ताब्यातील गाडीचा ताबा सुटला व गाडी हायवे रोडवर फरफटत गेल्याने डॉ.अविनाश डांगे वय २८ वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ.अविनाश डांगे यांचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले असून ते व्यवसायाने डॉक्टर आहेत.डांगे हे अतिशय हुशार मनमिळाऊ स्वभावाचे आहेत.भोपाळवाडी ता.लोहा येथे दवाखाना आहे येथे व परिसरातील रूग्णांची जन सेवा हिचं ईश्वर सेवा म्हणून सेवा करतात.
शासकीय दवाखान्यात शवविच्छेदन करून नातेवाईक यांच्या स्वाधीन केले.त्यांच्या मुळगावी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,आई, वडील, बहीण,भाऊ असा परिवार आहे.पोखरभोसी पंचक्रोशीतील गोरगरिबांचे मायबाप असायाचे . अविनाश डांगे हे संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संजय गांधी कलंबर या शाळेचा विद्यार्थी आहेत. त्यांच्या या अकाली निधनामुळे मुख्याध्यापक व शाळेतील वर्गशिक्षक व गावातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.