पक्ष संघटनवाढीसाठी लोकोपयोगी कार्य करा - भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर -NNL


नांदेड।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वच घटकाला विकासाच्या प्रवाहात आणले जात आहे. आगामी काळातील सर्व निवडणुकांचे अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी पदाधिकाऱ्यानी,  कार्यकर्त्यांनी लोकोपयोगी कार्य करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी केले. नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या आढावा बैठकीसाठी ते नांदेडमध्ये आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार  सुभाष साबणे, महानगराध्यक्ष  प्रवीण साले,बाळासाहेब पांडे, सौ प्राणिताताई देवरे चिखलीकर, सौ पूनम राजेश पवार, गंगाधर जोशी, प्रवीण चिखलीकर, श्री लक्ष्मणराव ठक्करवाड, श्रावण भिलवंडे,  रामदास पाटील ,  धर्मराज देशमुख,  बाळासाहेब खोमणे, किशोर देशमुख , शिवराज पाटील  होटाळकर , माणिकराव मुकादम,सौ चित्ररेखा गोरे, गोविंद अंकुरवार, गंगाधर कावडे, डॉ अमोल ढगे,यांच्यासह मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी हजर होते.


ते पुढे बोलताना म्हणाले की, भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  संघटनेचे कार्य तर करावे पण सामन्य माणसाच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य द्यावे .लोकोपयोगी कार्य करावे असे आवाहन केले. शहरी व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरिकांना भारतीय जनता पार्टी सोबत जोडत असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची माहिती त्या त्या घटकापर्यंत पोहोचवून त्या योजना सर्वसामान्य आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. जोपर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात आपण सहभागी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जनता  पक्षाशी जोडली जात नाही . 

भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यांच्या हितासाठी सदैव प्रयत्न करणारी पार्टी आहे  पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचण्यासाठी आपले कसोशीने प्रयत्न सुरू आहेत . त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लोक उपयोगी कामे हाती घेत असतानाच सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडेही डोळसपणे पाहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. दरम्यान भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष वेंकटराव पाटील गोजेगावकर यांचे नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी ज्या पद्धतीने सुरू आहे ती पद्धत अत्यंत उत्कृष्ट असून नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी भक्कमपणे उभी आहे. त्यामुळे आगामी काळातही जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील पक्ष बांधणी अधिक मजबूत करा अशा गौरवशाली शब्दात जिल्हाध्यक्षचे कौतुक करत केनेकर यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या.

या प्रसंगी  आढावा घेताना संघटन सरचिटणीस  संजय कौडगे यांनी सेवा सप्ताहाचा आढावा घेतला व शिक्षक मतदारसंघात झोकून देऊन काम करण्याच्या सूचना दिल्या.  यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष  व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी  जिल्ह्याच्या पक्ष संघटनेचा आढावा मांडला. गेल्या तीन वर्षात पक्षाच्या संघटनात्मक बधनिसाठी बूथ स्तरावर जाऊन कार्यकर्त्यांनी भक्कम फळी निर्माण केली. राज्य आणि केंद्रीय स्तरावरून आलेल्या प्रत्येक उपक्रमाची तंतोतंत अमलाबजवणी केली. ज्यामुळे पक्षीय बांधणीला ग्रामीण भागातही मोठा जनाधार मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वच घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातही जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.आगामी काळातील निवडणुका जिंकण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आता अधिक जोमाने कामाला लागले असेही गोजेगवकर म्हणाले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी