नांदेड। नांदेड येथील गोकुळनगर भागातील आर्य वैश्य संस्कृती महिला मंडळाच्या वतीने दिनांक एक ऑक्टोबर रोजी जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून समाजातील जेष्ठ महिलांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करून त्यांचा सन्मान करण्याचा आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला.
एकीकडे ज्येष्ठ महिलांना कोठेही कार्यक्रमासाठी प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळे त्यांना घरातच बसून राहावे लागते. अशा परिस्थितीत जेष्ठ महिलांचा सन्मान व्हावा. या उद्देशाने गोकुळनगर भागातील आर्य वैश्य संस्कृती महिला मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून एक ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम घेऊन ज्येष्ठ महिलांना सन्मानपूर्वक पाचारण करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
यात भावगीते व गेम घेण्यात आले. आणि रॅली काढण्यात आली. प्रत्येक जण म्हणत होते आमच्या म्हाताऱ्यांसाठी पहिल्यांदा कोणीतरी कार्यक्रम ठेवला आहे. आतापरत मुली, सुनांच्या बीसी मध्ये गेम पाहिले पण स्वतः आजच खेळत आहोत
आर्य वैश्य संस्कृती महिला मंडळच्या अध्यक्षा सौ . अर्चना संदीप गादेवार या नेहमीच समाजाला एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करत असतात व त्यांच्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत असतो यामध्ये सौ अलका चालीकवार, वैशाली पत्तेवार, सुलभा रुद्रवार, मोनिका कन्नवार. वैशाली कंधारकर आदींन सहकार्य केले आहे.