मुखेड, रणजित जामखेडकर। पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या वार्ताहार, प्रतिनिधी, पत्रकार, वितरक सर्वाच्या न्याय हक्कासाठी सक्रिय असणाऱ्या पत्रकार संरक्षण समितीची मुखेड तालुका कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड, जिल्हा सचिव शशिकांत गाढे पाटील, जिल्हा संघटक शेख रियाज चांदपाशा यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकिय विश्रामगृह येथे दि. ४ आॅक्टोंबर रोजी जाहिर करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्षपदी संदिप पिल्लेवाड, तालुका सचिवपदी मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.मिलिंद कांबळे, कार्याध्यक्ष माधव वारे, कोषाध्यक्ष दयानंद कानगुले, उपाध्यक्ष गंगाधर सोंडारे, ता. उपाध्यक्ष बालाजी शिंदे उंद्रीकर, सल्लागार बबलु मुल्ला, प्रसिद्धीप्रमुख रणजीत जामखेडकर, छायाचित्रकार पवन जगडमवार, सय्यद मुजीब, श्रीनिवास हाळदेकर, अंतेश्वर कांबळे आदींची बिनविरोध तालुका कार्यकारिणीत निवड करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.