बेटमोगरा येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन
मुखेड, रणजित जामखेडकर। महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितांनी धर्माच्या जातीचा, पोटजातीचा भेद करुन बहुजनात फुट पाडली. बहुजनांच्या मतांचा वापर करुन सत्तेत बसले. सेक्युलर - हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करुन आजी माजी सत्ताधाऱ्यांनी जनतेचे शोषण केले असून येणाऱ्या प्रत्येक निवडणूकांमध्ये प्रस्थापितांना धडा शिकविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सत्ता संपादन करण्याचा निर्धार वंचित घटकांनी, जनतेनी करावा असे आवाहन प्रदेश प्रवक्ते फारुक अहमद यांनी केले. मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापना प्रसंगी फारुक अहमद बोलत होते.
तालुक्यातील राजकीय घडामोडीचे केंद्र समजल्या जाणाऱ्या बेटमोगरा येथे मंगळवार दि. ४ आॅक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी मंचावर प्रदेश प्रवक्ते फारुक अहमद, जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, तालुकाध्यक्ष शंकर पा.आखरगेकर, कंधार तालुकाध्यक्ष संतोष पा.गवारे, शंकर पा.घोरबांड, प्रविणसिंह कच्छवा, अॅड.संजय भारदे, केतन भेदेकर, बबलु मुल्ला, पवन कांबळे येवतीकर, राजकुमार जोंधळे, आशिष भारदे आदींची उपस्थिती होती.
फारुक अहमद पुढे म्हणाले की, राजकीय अस्पृश्य असणाऱ्या वंचित घटकाला सत्तेत बसविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून श्रध्देय नेते बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर फिरत आहेत. निवडणूकीत प्रस्थापित राजकारण्यांच्या आमिषास बळी न पडता स्वाभिमानाने सत्ता संपादनासाठी बहुजनांनी एकजूट होऊन लढले पाहिजे. तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी स्वतः च्या परिवाराचा फायदा केला. पदे उपभोगली पण जनतेला आजही रोजगार-विकासाच्या खोट्या आश्वासने दिल्या जातात.
यावेळी जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, ता. समन्वयक अॅड संजय भारदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भारत सोनकांबळे तर आभार शाखाध्यक्ष मारोती गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास बेटमोगरा, धामणगाव, उच्चा, मावली, डोंगरगाव, बावलगाव सह मुखेड तालुक्यातून कार्यकर्ते आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाध्यक्ष मारोती गायकवाड, उपाध्यक्ष भानुदास शेगर, सचिव बाबुराव कांबळे, रोशन सोनकांबळे, नागोराव सोनकांबळे, अनिल पोटफोडे, सचिन असरवाड, रत्नाकर सोनकांबळे, पुंडलिक नवलेकर, दिलीप सोनकांबळे, संभाजी कांबळे,वाहेद शेख,राजु बाबर,दिल आदींनी प्रयत्न केले.