नविन नांदेड। हडको येथील बालाजी मंदिर देवस्थान येथे हजारो भाविक भक्तांच्या ऊपसिथीत ब्रम्होत्त्सव निमित्ताने आयोजित कल्याण उत्सव मध्ये ४ आकटोबर रोजी सायंकाळी दहा वाजता मंगल अष्टके, वांजत्री, फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये बालाजी, लक्ष्मी, पद्मवाती सोहळा संपन्न झाला यावेळी नावामनपाचा महापौर जयश्री ताई पावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व विश्वस्त मंडळ यांच्या ऊपसिथीत हा सोहळा संपन्न झाला.
हडको येथील बालाजी मंदिर देवस्थान येथे २० वा दसरा ब्रम्होत्त्सव निमित्ताने २६ सप्टेंबर ते ४ आकटोबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तर ४ आक्टोबंर रोजी रात्री पुरोहित सतिश गुरू पोतदार,विनायक गुरू पळशिकर,इंद्रमुणी दुबे,प्रकाश महाराज यांच्या मंत्रोपचार व विधीवत पूजनाने यजमान शिवानंद निलावार, सचिन संतोष जोशी, हर्षवर्धन संतोष कदम,सतिश रंगनाथ कवटीकवार या यजमान असलेल्या भक्तांनी विधीवत पूजन केल्यानंतर रात्री ८ ते दहाच्या सुमारास म़त्रोपंचार करण्यात आले,व रात्री दहाच्या सुमारास शुभ विवाहासाठी पाच मंगल अष्टके झाल्या नंतर नेत्रदीपक हा बालाजी,पदमवाती लक्ष्मी सोहळा संपन्न झाला यावेळी नावामनपाचा महापौर जयश्री ताई पावडे, माजी नगरसेविका सौ.ललीता शिंदे, भागिरथी बचेवार,वासवी व वनिता क्लब सिडको पदाधिकारी, यांच्या सह भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
लग्न सोहळ्या नंतर फटाक्यांच्यी आतषबाजी, वाद्यवृंद व प्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली,हा सोहळा यशस्वी होण्यासाठी विश्वस्त अध्यक्ष अरुण दमकोडंवार, विश्वनाथ देशमुख, बाळकृष्ण येरगेवार, बि.आर.मोरे काका, यांच्या सह विश्वस्त मंडळ पदाधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचलन दिलीप कदम यांनी केले.