जिल्ह्यात महावितरणच्या विविध विकास कामांसाठी एक हजार कोटींचा निधी -NNL

खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नांना यश जिल्ह्यात नवीन १८ उपकेंद्र मंजूर


नांदेड|
राज्यासह नांदेड जिल्ह्यात विजेची वाढती मागणी आणि तुटवडा, शिवाय महावितरण,  महापारेषणकडे आवश्यक असलेल्या साधन समुग्रीची, सोयी सुविधांची कमतरता या बाबी लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातही नाईलाज असतो भारनियमन करावे लागत असे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने महावितरण, महापारेषणसाठी आर डी एस एस योजनेतून नांदेड जिल्ह्यासाठी ९९९कोटी ९९ लाख रुपये मंजूर केले आहेत. यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यशस्वी पाठपुरावा केला. जिल्ह्यात नवीन १८ वीज उपकेंद्र निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी काळात नांदेड जिल्ह्यातील भारनियमनाला ब्रेक लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 

कृषी पंपाला आवश्यक वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडे असलेल्या अपुऱ्या साधनसामग्रीमुळे अनेक वेळा अडचणी निर्माण होतात किंबहुना ऐन हंगामात शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत होत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या पीक उत्पादन क्षमतेवरही मर्यादा पडतात . ग्रामीण आणि शहरी भागातही वीज वितरण कंपनीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे ग्राहक वीज कंपनीवर नेहमीच नाराज असल्याचे दिसून येते.रोहित्र वारंवार खराब होणे, उपकेंद्रांचा तुटवडा ,रोहित्र क्षमता कमी असणे, उच्च दाबवाहिनीची कमतरता, ए बी केबल, गावठाण वाहिनी विलगीकरण, उच्चदाब रोहित्र,  वितरण रोहित्र, वाहिनी नूतनीकरण ,उच्च दाब वाहिनी विलगीकरण, कॅपॅसिटर बँक आडी बाबींच्या कमतरतेमुळे या अडचणी भासत होत्या. 

त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने महावितरणला बळकटी देण्यासाठी अंतर्गत 997 कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे . नांदेड जिल्ह्यात नवीन 33/11 केव्ही उपकेंद्र 18 स्थापन करण्यात येणार आहेत . शिवाय अतिरिक्त उपकेंद्र रोहित्र 17 , रोहित्र रक्षमता वाढ 12 कामे , उच्च दाब वाहिनी 698 किलोमीटर,  ए बी केबल  1454, किलोमीटर गावठाण वाहिनी विलगीकरण २५८ , उच्च दाब रोहित्र 427 ,वितरण रोहीत्र  256 , वाहिनीचे नूतनीकरण 225 , उच्चदाब वाहिनी विलगीकरण 330 , कॅपॅसिटर बँक 54 बसविण्याच्या अनुषंगाने हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बेटमोगरा , देगलूर तालुक्यातील शहापूर , बिलोली तालुक्यातील सगरोळी,  नांदेड तालुक्यातील काकांडी, मुदखेड तालुक्यातील आमदुरा, लोहा तालुक्यातील किवळा, कारेगाव ,पेनुर ,मुदखेड तालुक्यातील माळकवठा ,हिमायतनगर तालुक्यातील इस्लापूर, भोकर तालुक्यातील भोसी,  किनी , किनवट तालुक्यातील बोधडी, नायगाव तालुक्यातील नरसी, माहूर तालुक्यातील वाई, हदगाव तालुक्यातील निवघा आणि नांदेड येथील एमआयडीसी मध्ये अतिरिक्त उपकेंद्र रोहित्र स्थापन करण्यात येणार आहेत. 

याशिवाय नांदेड तालुका नांदेड शहरातील अफजल नगर नांदेड तालुक्यातील मरळक, मालटेकडी, नेरली, देगलूर नाका, अर्धापूर तालुक्यातील चाभरा,लोहा तालुक्यातील हातनी, मुदखेड तालुक्यातील शेंबोली, हादगाव तालुक्यातील मानवाडी, रावणगाव, नायगाव तालुक्यातील मुगाव, धुप्पा, बिलोली तालुक्यातील कारला ,कवठा ,कंधार तालुक्यातील उमरज पार्टी,  लोहा तालुक्यातील दापशेड, भोकर तालुक्यातील वागद आणि इज्जतगाव रुई येथे नवीन उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व नवीन कामातून वीज पुरवठा अधिक सुरळीत करून शेतकऱ्यांना, सर्वसामान्य वीज ग्राहकांना, उद्योजक, व्यापाऱ्यांनाही दिलासा देण्यात येणार आहे. यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यशस्वी पाठपुरावा केला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी