उस्माननगर। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी किनवट व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड तसेच टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड होसुर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्वयंरोजगार मेळाव्याअंतर्गत ज्युनिअर टेक्निशियन या पदी निवड झालेल्या उस्माननगर येथील मुलीचा व पालकांचा उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात सत्कार करून सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नंदगावे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा कार्यकर्ते दत्ता पाटील घोरबांड, नरेश शिंदे, पत्रकार संघाचे सचिव प्रदीप देशमुख, यांची उपस्थिती होती.
ज्युनिअर टेक्निशियन पदी उस्माननगर येथील कन्या सुमती नरेश शिंदे, सरिता चांदू भिसे या मुलींची निवड झाली. उपस्थित डॉ.नंदगावे यांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित पालकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गणेश लोखंडे, लक्ष्मण कांबळे , माणिक भिसे, आरोग्य मित्र बहात्तरे आदींची कार्यक्रमासाठी उपस्थिती होती. सत्काररूपी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे यांनी केले.