अहिल्यादेवी वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा -NNL


नवीन नांदेड।
15 आक्टोबंर 2022 रोज शनिवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकर नगर सिडको नांदेड येथे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन प्रबोधनकार गोविंदराम शूरनर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. गोविंदराम यांनी वाचक वर्गाला मार्गदर्शन करताना म्हणाले.

" ग्रंथाचिय व्दारी उभा क्षणभरी।

तेणे मुक्ती चारी साधियेल्या ।।

विद्या मुखी म्हणा,विद्या मुखी म्हणा।

ज्ञानाची गणना कोण करी ।।....

काळ बदलत जातो तसे आपणही बदलले पाहिजे, आता विज्ञान काळात वाचन संस्कृती वाढवली पाहिजे , ज्ञान मिळवले पाहिजे म्हणून सरकारने गावागावात ग्रंथालय सुरू केले आहेत. त्याचा लाभ सर्वांनी घेतलो तरच आपण सर्व साध्य करू शकतो,जिवन सफल करू शकतो असे प्रतिपादन गोविंदराम शूरनर यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रा. झकास पवळे,केरबा जेटेवाड, यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला विठ्ठल पातेवार, जंगले , रामगीरवार , संदिप गायकवाड, निखिल खेते, गिरी, शिरसेकर सर , गौरी देवकते, सुर्यकांत गुंडाळे, मदनेश्वर शूरनर, विलास महाजन, अशोक सुपेकर, व इतर वाचक वर्ग यांची  ‌प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आय़ोजन ग्रंथपाल मदनेश्वरी शुरनर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.सावित्रा शूरनर यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी