कुस्त्याची दंगल व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
उस्माननगर, माणिक भिसे। प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी हिमवत वैराग्य पिठाधिश्वर श्री.श्री.श्री.१००८ जगद्गुरु भीमाशंकर महास्वामीजी, शिवाचार्य रत्न श्री. ष.ब्र. प्र. षडाक्षारी शिवाचार्य महाराज यांच्या सान्निध्यात दि. २१ ऑक्टोबर २०२२ रोज शुक्रवार पासून श्री संत आगडडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात होणार असून दरवर्षी भरविण्यात येणारे पशुप्रदर्शन यात्रा कमिटी व जि.प.यांच्यावतीने या वर्षी लंम्पी आजारामुळे रद्द करण्यात आले आहे.
श्री. संत आगडडंमबुवा यात्रेनिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन दि.२१ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२२ दरम्यान धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये दि.२७ ऑक्टोबर गुरूवारी जंगी कुस्त्यांचे आयोजन केले आहे .तर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले आहे.दि.२७ रोजी सायंकाळी अग्नीपुजा करून अग्नी प्रज्वलित करून रात्रभर संगीत भजन होईल , पहाटे चार वाजता होम होउन दि. २८ ऑक्टोबर रोजी पालखी मिरवणूक काढण्यात येईल . त्यानंतर दहा वाजता ह. भ.प. ज्ञानोबा माऊली वने महाराजांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाच्या कार्यक्रमाने यात्रेचा समारोप होणार आहे. श्री.संत आगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी ४ ते ५ काकडा भजन , ६ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण ९ ते ११ गाथा. १२ ते ४ महीलांचे भजन ५ ते ६ हरिपाठ रात्री ९ वाजता हरिकिर्तन व जागरण अदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दि. २१ ऑक्टोबर रोजी प्रवचनकार म्हणून ह.भ.प. शिवराज महाराज कलंबरकर ,तर किर्तनकार म्हणून ह.भ. प. संभाजी महाराज दिवटे , दि.२२ ऑक्टोबर रोजी प्रवचनकार म्हणून ह.भ.प. दत्ता पाटील सोरगे तर किर्तनकार म्हणून ह.भ.प. विलास महाराज येजगे , दि.२३ ऑक्टोबर रोजी प्रवचनकार म्हणून ह. भ.प. गयबी नागेंद्र भारती महाराज पानभोसी ,तर रात्रीला किर्तनकार म्हणून ह.भ.प. पवन महाराज बीडवे. ,दि.२४ ऑक्टोबर रोजी प्रवचनकार म्हणून ह.भ.प. बाबुराव उमाजी गोरे ( मा.तंटामुक्तध्यक्ष ) तर रात्रीला किर्तनकार म्हणून ह.भ.प. रोहिदास महाराज मस्के, दि.२५ रोजी. प्रवचनकार म्हणून ह.भ.प. सौ. वर्षाताई किशनराव डांगे , तर किर्तनकार म्हणून ह.भ.प. भगवान महाराज सेद्रीकर , दि.२६ रोजी प्रवचनकार म्हणून ह.भ.प. कुमारी ज्योती बहनजी प्रजापिता ब्रम्हकुमारी कंधार ,तर रात्रीला किर्तनकार म्हणून ह.भ.प. निवृत्तीनाथ महाराज इसादकर , दि. २७ रोजी सकाळी ९ वाजता किर्तनकार म्हणून ह.भ.प. एकनाथ महाराज आळदीकर यांचे तर जि.प.शाळेच्या प्रांगणात गोवळकर गुरुजी रक्त केंद्र , नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे व जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२८ ऑक्टोबर रोजी पालखी मिरवणूक त्यानंतर दहा वाजता किर्तनकार म्हणून ह.भ.प. श्री.ज्ञानोबा माऊली महाराज वने गुंडेवाडी यांचे काल्याचे किर्तन आयोजित केले आहे.
काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी श्री.संत आगडंमबुवा यात्रेतील धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व समस्त गावकरी मंडळी कलंबर ( बु.) यांनी केले आहे. यात्रेतील पशुप्रदर्शन रद्द- श्री.संत आगडंमबुवा यात्रेनिमित्त दरवर्षी भरविण्यात येणारे पशुप्रदर्शन या वर्षी महाराष्ट्रात जनावरांना लंम्पी आजार झाल्यामुळे पशुप्रदर्शन भरविण्यात येणार नसल्याचे जि.प.पशुसंवर्धन विभाग व यात्रा कमिटी कलंबर यांनी आजारामुळे रद्द केली आहे... पशुधन मालकांनी या यात्रेत कोन्ही जनावरे आणू नये असे आवाहन केले आहे.