वादळी वारे, विजांचा गडगडाटात झाला हिमायतनगर शहरासह तालुक्यात पाऊस
हिमायतनगर, अनिल मादसवार| आज दुपारी हिमायतनगर शहर व तालुका परिसरात विजांच्या कडकडासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यावेळी तालुक्यातील सिबदरा - मंगरूळ परिसरात सोयाबीन काढून परत येणाऱ्या मळणीयंत्रावर वीज कोसळाळुन एक जण जागीच ठार झाला असून, दोघे जण जखमी झाले असून, तीन जण बालंबाल बचावले असल्याची घटना घडली आहे. सुनील साहेबराव वायकोळे वय ३६ वर्ष रा. वारंगटाकळी असे मयत शेतमजुरांचे नाव आहे.
![]() |
मयत शेतमजूर सुनील साहेबराव वायकोळे वय ३६ वर्ष रा. वारंगटाकळी |
दिनांक १८ ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडासह दुपारी २ वाजेच्या सुमारास हिमायतनगर शहर व तालुका परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यात मंगरूळ - सिबदरा रस्तावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन काढणीचे काम सुरु होते. शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीन काढणीचे काम नेमकेच आटोपून मजुरदार मळनीयंत्र घेऊन रस्त्यावर आले असता विजांचा कडकडाट होऊन दमदार पाऊस झाला. यावेळी मळणीयंत्रावर बसून जात असताना अचानक वीज कोसळली यात सुनील साहेबराव वायकोळे वय ३६ वर्ष रा. वारंगटाकळी यांचा जागीच मृत्यू झाला.
तर साहेबराव आबाराव टोकलवाड वय २० वर्ष यांच्या तळपायाला शेख लागाला, गजानन शंकर टोकलवाड वय २२ वर्ष यांच्या कानाला शेक लागून जखमी झाले आहेत. तर अन्य तीन जण या घटनेतून बालंबाल बचावले आहेत. या जखमींना तातडीने हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दखल करण्यात आले असून, यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर मयताचे शवविच्छेदन केल्यानंतर मयताचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहे. घटनेची माहिती या गावचे पोलीस पाटील, सरपंच, माजी सरपंच व गावकर्यांनी पोलिसांना दिली असून, याबाबत नोंद करण्याची प्रकारीया सुरु आहे.