हदगाव, शे चांदपाशा। हदगाव शहरातील गोजेगाव ते वारंगा हा नँशनल हायवे वाहनधारका करिता अवघड जागी दुखणे झाले असुन, शुक्रवारी शहरानजिक गोजेगाव उड्डाण पुलाजवळ चार वर्षापासुन खोदलेल्या कच्च्या रोड मुळे जीवघेणी खड्डे पडल्यामुळे नेहमी प्रमाणे ट्रक रुतल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
स्थानिक पोलिसांनी जेसीबी आणुन ते वाहन काढल्याने नंतर वाहतूक सुरळीत झाली गोजेगाव ते वारंगा या नँशनल हायवेचे अर्धवट कामा मुळे या पुर्वी अनेक अपघात झालेलं आहेत तरी संबंधित कञाट एजन्सी बेफिकर आहे. या रोडचे काम अध्याप ही पुर्ण झालेल नाही कारण या बाबतीत खासदार आमदार अन्य नेते का गप्प आहेत. या बाबतीत माञ वाहनधारकांत व नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गावरुन नागपुर ते नादेड या राष्ट्रीय महामार्गावरुन जड वाहने कच्च्या मालाची व इतर वाहनांची प्रंचड प्रमाणात वाहतूक होते.
या राष्ट्रीय महामार्गाचे काम अध्याप ही अपुर्ण असुन यामुळे यामुळे या क्र.३६१ राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणे हा जीवघेणी ठरत आहे. मोठी वाहने खडतर मार्गाने कसे तरी जात आहे तर छोटे वाहनाना फार ञास होत आहे या बाबतीत मिळेल्या माहीती नुसार संबंधित काम 'सद् भावना कंपनी हे रोडचे काम करीत असल्याची माहीती मिळाली या कंपनीवर देखरेख ठेवणारे प्रशासकीय कार्यालय कुठं आहे अध्याप ही नेत्याशिवाय कुणाला ही माहीत नाही ही वस्तुस्थिती आहे. संबधित एजन्सीने हे काम गेल्या तीन ते चार वर्षापासुन संथपणे करित आहे परिणाम स्वरुप यामुळे अनेकअपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या रोडवरील वाहतुक आध्यप ही सुरळीत झालेली नाही या राष्ट्रीय महामार्गाची 'लायबिलिटी '१५वर्षापर्यत असल्याची माहीती मिळाली त्यापैकी तर चार वर्ष तर निघून घेलेले आहे.
अश्या कच्च्या खोदलेले रोड मुळे ट्रक रुतण्याची मालिकाच सुरु आहे तर या रोडवर अनेक उड्डाण पुलाचे काम रखडलेले आहे विशेष केद्र सरकार व राज्य सरकार व विशेषतः केद्रिय मंञी नितिन गडकरी रोडच्या बाबतीत गजावजा करित आहे या अर्धवट नागरिकांना वाहनधारकांना अतिशय ञास होत आहे यामुळे हदगाव तालुक्यातील जनतेत माञ संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवारी सध्या हदगाव शहरानजीक गोजेगाव येथे उड्डाण पुलचे अर्धवट काम पुलाच्या दोन्ही बाजुला मोठमोठे खड्डे पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती वाहनाच्या शहरातील उमरखेड फाट्यापासुन ते वाहनाच्या रांगा लागल्या होत्या यामुळे प्रवाशी वाहनधारकांचे माञ खुप हाल झाले.