इंग्रजी शाळांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक - खासदार चिखलीकर -NNL


नांदेड।
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन, नांदेड ( MESTA) च्या सदस्यांसोबत आज सकाळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक संपन्न झाली. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी इंग्रजी शाळांच्या समस्या विस्तृतपणे समजून घेतल्या आणि तात्काळ शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून मंत्रालयात बैठक घेऊन इंग्रजी शाळांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत चर्चा केली. शिक्षणमंत्र्यांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिला. 

यावेळी मेस्टाचे प्रदेशाध्यक्ष व लिटल किंग्स इंग्लिश स्कूल, वसमत चे नामदेव दळवी, राज्य सहसंघटक व सह्याद्री स्कूल ऑफ इन्स्टिट्यूटशनचे सुदर्शन शिंदे, ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूलचे श्रीनिवास द्यावरशेट्टी, पिनाकल इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे नागेश जवळगावकर, विद्यानिकेतन पब्लिक स्कूल चे भारत होकर्णे, भोकरचे तालुकाध्यक्ष व विमल इंग्लिश स्कूलचे लक्ष्मण जाधव, मेस्टाचे जिल्हाध्यक्ष व शंकरराव चव्हाण इंटरनॅशनल स्कूल चे प्रा. शिवाजी उमाटे, सहसचिव व ओयासिस इंग्लिश स्कूलचे महेश कुंटुरकर, सचिव व विसडम इंग्लिश स्कूल चे राजकुमार घोडके, उपाध्यक्ष व किड्स कॅम्पस इ लर्निंग स्कूल चे सुहास पाटील टाकळीकर, स्वराज्य इंग्लिश स्कूल चे मस्के, राजाई इंग्लिश स्कूल चे सुभाष कोकणे, हदगाव चे तालुकाध्यक्ष व आर जे इंग्लिश स्कूलचे संदीप भुरे, नायगावचे तालुकाध्यक्ष व गुरुकुल पब्लिक स्कूलचे संतोष कल्याण, ग्लोबल इंग्लिश स्कूल लोहा चे संजय मोटे इत्यादीची उपस्थिती होती.

यावेळी इंग्रजी, सेमी इंग्रजी व स्वयं अर्थसहाय्यीत शाळेच्या RTE , शाळा संरक्षण कायदा, शाळेची राहिलेली फीस ना भरता TC देण्यात येऊ नये या व इतर महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी नांदेड जिल्ह्यातील इंग्रजी शाळा संचालकांची लक्षणीय उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी