दीपावलीत हिमायतनगर येथील सूर्यवंशी कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात पती गंभीर, पत्नीचा मृत्यू, दोन बालके किरकोळ जखमी -NNL


नांदेड।
दीपावली निमित्त पुणे येथून गावाकडे येत असताना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील व्यापारी श्रीकांत सूर्यवंशी यांच्या वाहनाचा बीड जवळ अपघात झाला आहे. या अपघातात दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले होते. उपचारा दरम्यान त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तर श्रीकांत सुर्यवंशी हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. दोन बालकांनाही जखमा झाल्या असून, मयत झालेल्या सौ भाग्यश्री सूर्यवंशी यांचे पार्थिवावर आज हिमायतनगर येथे आणल्यानंतर 10.30 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अशी माहिती भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांनी दिली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हिमायतनगर येथील श्रीकांत सूर्यवंशी हे आपल्या कुटुंबासह पुणे येथे गेले होते. आता दिवाळी असल्याने कुटुंबीय आपल्या कारणे हिमायतनगर मूळ गावाकडे येत असताना बीडला दि.23 रोजी सकाळी भीषण अपघात झाला. त्यात श्रीकांत रामराव सुर्यवंशी हे गंभीर जखमी झाले, त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता भाग्यश्री श्रीकांत सुर्यवंशी यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. दोन्ही बालकांना किरकोळ जखमा झाल्या. त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हालवण्यात आले आहे. 

घरातील कुटुंबीय दिवाळीच्या आनंदाच्या तयारीत असताना काळाने घाला घातला. आणि ही अपघाताची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे सूर्यवंशी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेत मयत झालेल्या भाग्यश्री श्रीकांत सूर्यवंशी यांचे प्रेत हिमायतनगर येथे आणले जात असून, त्यांच्या पार्थिवावर आज ठीक 10, 30 वाजता हिमायतनगर येथील लकडोबा चौक परिसरात असलेल्या हिंदू स्मशान भूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.  अचानक घडलेल्या या घटनेने हिमायतनगर शहरावर देखील दुःखाचे सावट निर्माण झाले आहे. या दुखातून सावरण्याची शक्ती ईश्वर सूर्यवंशी कुटुंबीयांना देवो अशा प्रकारे अनेकांनी स्वर्गीय भाग्यश्री सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दिवाळीच्या दिवशी बीड जवळील अपघातात मयत झालेल्या भाग्यश्री श्रीकांत सूर्यवंशी यांचे प्रेत सकळी 11 वाजेच्या सुमारास आणण्यात आल्यानंतर अंत्ययात्रा करण्यात आली. येथील हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, प्रसिद्ध व्यापारी मजहर मौलाना, श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक व शहरातील नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी