हिमायतनगर येथील आदिवासी मुलांच्या वसतीगृहभावती घाणीची साम्राज्य ! विदयार्थ्यांचे आरोग्य धोक्यात...NNL

वारंवार तक्रार देऊन सुद्धा संबंधित प्रशासन मात्र निद्रवस्थेत..


हिमायतनगर,शंकर बरडे।
 हिमायतनगर शहरातील उमर चौक परिसरात असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृह परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून याबाबत अनेकदा तक्रार देऊनही नगरपंचायत प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेचेसोंग घेत आहे.

सामाजिक न्याय विभागा मार्फत चालविण्यात येत असलेले आदिवासी विद्यार्थी वसतिगृह हिमायतनगर येथे मागील ३५ वर्षा पासून कार्यरत आहे. सदर वसतिगृह कै. नागोरावजी धुमाळे माजी जि.प.सदस्य यांनी ग्रामीण भागातील आदिवासी गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी निर्माण व्हावी म्हणून त्यांच्या अथक प्रयत्नातुन कार्यान्वित केले. 


या वसतिगृहाचा हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील हजारो गरिब विद्यार्थ्यांना फायदा झाला. मागील २० वर्षापासून सदर वसतिगृह उमर चौक परिसरातील सुसज्ज इमारतीत आहे. इमारत परिसरातील अंतर्गत रस्त्यावर नांदेड – किनवट रस्ता दुरूस्तीच्या कामातील शेकडो ब्रास मुरूम परिसरातील अंतर्गत रस्त्यावरच अवैध रित्या साठवला आहे. 


साठविलेल्या अवैध मुरुमामुळे गटारीतील घाण पाण्याच्या प्रवाह बाधित होवुन ईमारतीच्या बाजूला वळवलेला आहे.  त्यामुळे घाण, दूषित पाणी साचुन तलावाचं स्वरूप आलेलं आहे. सदर अवैध साठवलेल्या मुरुमामुळे २०० ते २५० मीटर परिसरातील गटारीचे घाण पाणी वसतिगृह इमारती बाजूला साचलेले आहे. वसतिगृहाला पाणीपुरवठा करणारी कुप नलिका या गटारीच्या घाण पाण्यात आली आहे. या पाण्याचा बंदोबस्त करण्याबाबत नगरपंचायत हिमायतनगर  यांना लेखी वांरवार कळविण्यात आले आहे तसेच समक्ष भेटुन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. 

हि बाब तहसिल प्रशासनाच्याही निदर्शनास आणून दिली होती दूषित पाण्यामुळे विद्यार्थी व कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात आहे.यामुळे गटारीच्या सांडपाण्याची समस्या अधिकच बिकट होणार हे निश्चित. जिल्हाधिकारी हि समस्या कशी सोडवतात याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागलेले आहे...


रस्त्यावर मुरूम साठवून गटारीचा प्रवाह बदलून वयक्तीक इमारतीकडे वळवता येतो काय? नगरपंचायतला नियमित कर भरतो त्या बदल्यात त्यांनी रस्ता, पाणी, विजेचे दिवे ई. सुविधा पुरवली पाहिजे असे न होता उलट गटारीची पाणी वळवलेले आहे हे कशात बसते यास काय म्हणावे?  ( भारत निर्माण  )

विद्यार्थी, कर्मचारी, व परिसरातील जनतेच्या आरोग्याची काळजी न घेता त्यांची गैरसोय करणे हि या टोकाच्या असंवेदनशिलतेला काय म्हणावं ? संत गाडगेबाबाची स्वच्छतेची प्रेरणा स्वतः ननगरपंचायत घेणार नसेल तर जनतेसमोर काय आदर्श ठेवणार? लोकसेवकच स्वच्छ भारत, सुंदर भारत संकल्पना कागदावरच ठेवणार आहेत काय ? या सर्व गोष्टी प्रशासनास कळवून सुद्धा कोणतीच कार्यवाही होत नाही. 

देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सव वर्ष नंतरही हि बाब होणार असेल तर अंत्यत खेदजनक आहे. भारत शासन असे वागणार असेल तर ब्रिटिश शासन काय वाईट होते ? अशा अनेक समस्या संदर्भात निवेदन देऊन देऊन आम्ही थप्प झालो. आता तरी आम्हाला न्याय मिळेल का ? असा सवाल कांताराव पागोजी धुमाळे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना केला आहे..

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी