बैंकेचे कर्ज, सततची नापिकीला कंटाळून लाईनतांडा येथील शेतकऱ्याने केली आत्महत्या -NNL

चिंताग्रस्त शेतकऱ्याने घेतलं आपल्या शेतात विषारी औषध 

हिमायतनगर तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच


हिमायतनगर, अनिल मादसवार|
तालुक्यात मागील काळात झालेल्या अतिवृष्टीने हैराण झालेले शेतकरी आता आत्महत्यांच्या वाटेवर वळताना पाहवयास मिळते आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील आत्तापर्यंत ८ शेतकऱ्यांनी आत्महत्यां केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाना अजूनही शासनाची मदत मिळालेली नसताना हिमायतनगर तालुक्यातील लाईन तांडा येथील आणखी एका शेतकऱ्याने दि.०१ ऑकटोबर रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.  संतोष लिंबाजी राठोड वय ३५ वर्ष असे मयत शेतकऱ्याचं नाव आहे. 

मागील काही वर्षांपासून हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडला आहे. सततची नापिकी आणि बैंकेच्या कर्जाचा वाढता बोजा पाहता शेतकरी आत्महत्या सारख्या टोकाच्या भूमिका घेत आहेत. मागल्या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने शेतातील पिकांचे पूर्णतः नुकसान केले. तर बहुतांश शेतात पाणी जमा राहिल्याने पिके कमी तर तण जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात आलेल्या हिमायतनगर तालुक्यात ७ ते ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांच्या निराधार झालेल्या कुटुंबियांना शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे. मात्र अजूनही त्यांना मदत मिळालेली नाही आहे. या सर्व गोष्टीची चर्चा होत असताना आज दि.०१ ऑकटोबर रोजी हिमायतनगर तालुक्यातील मौजे लाईन तांडा येथील संतोष लिंबाजी राठोड वय ३५ वर्ष या तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. आज सकाळी नित्याप्रमाणे तो मंगरूळ शिवारातील शेतात पत्नी व मुलीसोबत शेतात गेला होता. 

शेतातील पिकांची परिस्थिती पाहताना यंदासुद्धा अतिवृष्टीने शेती नुकसानीत आली आहे. पिके हातची गेली असल्याने बैंकेचे कर्ज कसे फेडावे असे बोलत होता. शेतात गेल्यावर पत्नी आणि मुलगी पिकांतील वाढलेला कचरा निंदण करण्याच्या कामात लागले. यावेळी त्या दोघीना तो म्हणाला कि.. मी तिकडील पिकात तण किती झाले ते पाहून येतो. असे म्हणून गेला तो परत आलाच नाही... त्यामुळे पत्नी व मुलगी त्यांना पाहण्यासाठी गेले असता त्यांनी कोणतेतरी विषारी औषध प्राशन केल्याचे दिसले. तातडीने नातेवाईकांच्या मदतीने हिमायतनगर येथिल ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मागील सह महिन्यापासून शेतकरी कर्जासाठी बैंकेच्या चकरा मारतो आहे. मात्र बैंक शेतकऱ्यांना कर्ज देत नाही, आता पिके काढण्याची वेळ आली असताना शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन काय करावा. त्यातच अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आर्थिक संकटात सण उत्सव कसे साजरे करायचे आणि बैंक कर्ज देत नसल्याने उधारीवर घेतलेली बियांची रक्कम कुठून द्याचाही आणि अगोदर असलेल्या बैंकेच्या कर्जाचा बोजा या विवंचनेने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे टोकावर जात असून, त्यातून अश्या घटना घडत आहेत. कृषी मंत्र्यांनी सांगितल्या प्रमाणे शेतकऱ्यांच्या  आत्महत्या थांबविण्यास शासन अपयशी ठरत असल्याचे हे जिवंत उदाहरण असल्याचा आरोप सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी केला आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी