नांदेड| राजयोगाचया माध्यमातून तणावापासून मुक्तता अभियान नांदेड जिल्हाकारागृहात दिनांक 9 ऑक्टोबर रोज रविवार रोजी ब्रहमाकुमारी कैलासनगर नांदेड व रोटरी क्लब नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला वंडरगिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आलेल्या डॉ.सुधाकांकरिया या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या प्रसंगी राजयोगाचया माध्यमातून तणावापासून कशी सुटका होते. आपण आपल्यात चांगले विचार पेरले तर त्यांचे फळही चांगलेच मिळते यावर डॉ. सुधाकांकरिया यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी ब्रहमाकुमारी सेंटरच्या वतीने नागनाथ महादापुरे म्हणाले की, आपणास स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी भरपुर वेळ मिळालेला आहे. यावेळेचा सदुपयोग आपल्यात लेकमजोरी दूर करण्यासाठी व सकारात्मक विचार अंगिकारणयासाठी यांचा वापर करून एक आदर्शव्यक्तिमत्व घडवून आदर्श निर्माण करावा असे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे हे होते. या कार्यक्रमाला ब्रहमाकुमारी कैलासनगर सेवाकेंद्राच्या वतीने ब्रहमाकुमारी शिव प्रियाबहेन, डॉ. संतसंपदा, डॉ.सौ.तुंगेनवार, व कारागृहाच्या वतीने श्री.रूकमेतसेच अँड. प्रविण आयचित यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन प्रा.राठोड यांनी केले. व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंदी बांधवांनी व कारागृहातील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाची सांगता राजयोगा मेडिटेशनने झाली. बंदी बांधवांना राजयोगाचया माध्यमातून तणावापासून मुक्तता अभियान ब्रहमाकुमारी कैलासनगर सेवाकेंद्राच्या संचालिका शिवकन्यादीदी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.