कार्यालयांची बगल

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील वाळके वाडीच्या कुपोषणाने ग्रासलेल्या अनुसायाच मुद्दा वर्तमान पत्रांनी ऐरणीवर घेतल्याने खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने कुपोषण मुक्त अभियानाची हाक दिली असली तरी जिल्हा प्रशासनाच्या हाकेला अनेक शासकीय कर्मचार्यांनीच खो.. दिला असल्याने येथील महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयच उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील एकूण ० ते ६ वयोगटातील कुपोषित बालकांची संख्या ११ हजार ६३० असून, त्यातील साधारण श्रेणीतील विद्यार्थी १० हजार ५०६ असून, मध्यम श्रेणीत ६० ते ७० तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या १५३ असल्याचे महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयातील विस्तार अधिकारी योगेश थेटे यांनी सांगितले आहे. कागदोपत्री कुपोषित विद्यार्थ्यांची आकडेवारी १५३ असली तरी प्रत्यक्षात मात्र हि संख्या ग्रामीण भागात अनेक पटीने असल्याचे आढळून येते. तीव्र कुपोषित मध्यम कुपोषित आणि साधारण कुपोषित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाडी तांड्यावरील गरिबांच्या गरि मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसते. अंगणवाडी व मिनी अंगणवाडीतून कुपोषण मुक्तीसाठी केले जाणारे प्रयत्न अतिशय तोकडे असल्याने कुपोषणावर मात करणे सहज सहजी शक्य नसल्याचे जाणकार सांगतात.

अंगणवाडी व मिनी अंगणवाड्या मधून माता व बालकांना पुवण्यात येणार पौकेट बंद सकस आहार हा वास्तवात कुणी खातच नाही.., याविषयी विस्तार अधिकारी थेटे यांनीही यास दुजोरा दिला असून, त्याचा वापर दुभत्या जनावरांना चारण्यासाठी सर्रास केला जातो हे अगदी सत्य असल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस भ्रमण ध्वनिवरून बोलताना सांगितले. मात्र यावर होणार खर्च लाखो रुपयाचा असल्याने सकस आहार दुभत्या जनावरांच्या पोषणासाठी कमी येत असल्याचे तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून येते. यात सातूचे पीठ, सुकळी, शिरा, उपमा आदी पौकेट बंद पोषक आहार पुरवण्यात येत असला तरी ग्रामीण भागातील महिला व बालक मात्र हा आहार खातच नाहीत.परंतु आलेले पौकेट वाटप करून वरिष्ठांना अहवाल द्यावा लागत असल्याने अंगणवाडी कार्यकर्त्या हे पोकिट बळजबरीने गरोदर माता व बालकांच्या नावावर खपवून मोकळे होत असल्याचे सर्रास आढळून येत असल्याने कुपोषण मुक्तीसाठी ठोस उपय्यायोजानांची गरज असल्याचे जनकारातून बोलले जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी