माजी नगरसेवक प्रा.आडेपवार यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील दिव्यांग वंचित कुटुंबाना शिधापत्रिका मिळणार ..!
मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड नगर परिषद हद्दीतील दिव्यांगांना अंत्योदय अन्न योजने अंतर्गत लाभ मिळावा यासाठी माजी नगरसेवक प्रा.विनोद आडेपवार यांनी दि. १५ जून २०२२ , दि. २७ जून २०२२ रोजी पत्र व्यवहार केला होता. या पत्राची प्रशासनाने दखल घेत शहरातील १४९ दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा यासाठी मुख्याधिकारी यांनी ठराव घेत तहसिल प्रशासनाकडे यादी पाठवली आहे.
दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळतो हे खूप कमी नागरिकांना माहीत होते पण माजी नगरसेवक प्रा. आडेपवार यांनी आपल्या निवेदन सोबत शासन निर्णय क्र . शिवाप -२०१३ / प्र.क्र २८६ / नापु -२८ दि . १७ जुलै २०१३ या प्रकारचा जीआर देत अंमलबजावणी करावी अशी मागणी केली पण असा उपक्रम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी झाला नसल्याने प्रशासन सुद्धा शांत होते पण प्रा. आडेपवार यांनी नांदेड जिल्ह्याचे पुरवठा मुखेड येथे आले असता याबाबत माहिती दिली.
तहसीलदार व पुरवठा विभाग, मुख्याधिकारी यांना आपला पाठपुरावा सतत चालू ठेवला यात दि. ४ ऑक्टोबर २०२२ रोजी मुख्याधिकारी यांनी ठराव घेत १४९ लाभार्थ्यांची यादी तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्याकडे पाठवली असून यात १४९ लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यासाठी नपाच्या वतीने शिफारस करण्यात आली. यामुळे या दिव्यांग बांधवाना अंत्योदय योजनेचा लाभ व शिधापत्रिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुखेड शहरातील ( ४० % ) वरील अपंगत्व असलेल्या ( १४ ९ ) दिव्यांग लाभार्थीची शिफारस न. परिषदेने केली असून दिव्यांग बांधवाना शिधापत्रिका व अंत्योदय योजनचा लाभ मिळणार असल्याने मला मोठ समाधान वाटत आहे. तहसिल प्रशासनाकडून यादी तात्काळ मंजूर करून लाभार्थ्यांना शिधापत्रिका देण्याचा कॅम्प ठेवावा अशी विनंती करतो. यापुढेही समाजातील वंचित घटकापर्यंत शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. प्रा.विनोद आडेपवार, माजी नगरसेवक, नगर परिषद मुखेड.