उस्माननगर, माणिक भिसे। कंधार तालुक्यातील मौजे शिराढोण येथील पंचशिल बुद्ध विहार येथे विजयादशमी दिनी 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सविस्तर माहिती अशी की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून समता, स्वातंत्र्य , बंधुत्व ,व पंचशील तत्त्वावर आधारित भगवान गौतम बौध्दांचा बौध्दधम्म १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर या ठिकाणी आपल्या लाखो अनुयायांसोबत विजयादशमी दिवशी स्विकारले.हा धम्मचक्र प्रवर्तन दिन दरवर्षी सर्वत्र साजरा करण्यात येतो.शिराढोण येथे
यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वरील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण सेवानिवृत्त भारतीय जवान उपा. निवृत्ती राक्षसे शिराढोण कर आणि उपा.करन जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याबरोबर पंचशील बुद्ध विहार शिराढोण येथे प्रथम: तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्प पूजा करण्यात आले.
या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपा. माधवदादा जमदाडे हे होते.यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण आदरणीय माधवदादा जमदाडे (रिपब्लिकन सेना, मराठवाडा अध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी त्रिशरण पंचशील व संपूर्ण पुजापाठ घेण्यात आले. यावेळी बौद्ध उपासक मनोज जमदाडे, सहशिक्षक भगवान राक्षसे, सेवानिवृत्त जवान करन जमदाडे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर आपले विचार मांडले.
यानंतर माधवदादा जमदाडे यांच्या अध्यक्षीय भाषणाने सांगता करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर दादा झगडे,भारत दादा आदि उपस्थित होते. हा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा शिराढोण यांच्या वतीने संपन्न झाला .यावेळी उपासक पंडित राक्षसे, मधूकर जमदाडे, बालाजी जमदाडे,दत्ता राक्षसे, कचरू राक्षसे व मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्ध उपासक मनोज जमदाडे यांनी केले.