नांदेड। अॅड. रमेश राजूरकर यांनी तब्बल 7 वर्षे भोकर येथे सरकारी वकिल म्हणून निर्भीडपणे न्यायालयात शासनाची बाजू मांडली. या काळात अॅड. राजूरकर यांच्या वकिलीतील कौशल्याने दोन खटल्यामध्ये दोघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. तर विविध 37 गंभीर खटल्यांमध्ये जन्मठेव व इतर शिक्षा न्यायालयाने ठोठावल्या आहेत.
अॅड. राजूरकर यांच्यामुळे अनेक पीडित, अन्यायग्रस्तांना न्याय मिळाला. एका खटल्यादरम्यान त्यांच्यावर जिवघेणा प्रसंग उद्भवला होता. त्यानंतर पोलिस यंत्रणेकडून त्यांना सुरक्षारक्षक पुरविण्यात आला. अॅड. राजूरकर यांनी आपल्या कार्यकाळातील संपूर्ण अहवाल ख्यातनाम विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते त्यांच्या जळगाव येथील निवासस्थानी प्रकाशित केला.