उस्माननगर, माणिक भिसे। आध्रा प्रदेश राज्यातील श्रीकाकुलम जिल्ह्याचे प्रशासकीय जिल्हाधिकारी तथा उस्माननगर ( मोठी लाठी ) ता.कंधार येथील भूमिपुत्र श्रीकेश लाठकर यांचा उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी उस्माननगर पोलिस स्टेशनचे सपोनि पि.डी.भारती, श्री. धनंजय देशपांडे (लाठकर), पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, केंद्रप्रमुख जयवंतराव काळे नारायण पांचाळ, राजीव सोनटक्के यांची उपस्थिती होती.
यावेळी उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आंध्रप्रदेश राज्यातील श्रीकाकुलम जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी श्रीकेश लाठकर यांचा सत्कार करून चर्चा करण्यात आली.
यावेळी श्रीकेश लाठकर म्हणाले की , माझ्या गावात झालेला हा सत्कार सर्वात मोठा आहे. याचा आनंद शब्दात सांगता येणार नाही. जिल्हाधिकारी म्हणून भाषाण करण वेगळ असत ,आज मी माझ्या जन्मभूमित बोलत आहे.ही माझ्यासाठी सुध्दा वेगळी संधी आहे.गावातील बालपणीच्या आठवणीना वाटमोकळी करुण मनमोकळे पणाने सर्वांशी मनसोक्त संवाद साधला.सर्वांच्या आशिर्वादाने सामान्यांची सेवा करण्यासाठी भविष्यात या पुढची संधी मला मीळेल ,असा दुर्दम्य विश्वास व्यक्त केला.
पुढे बोलताना म्हणाले , विद्यार्थीनी चिकाटी आणि मेहनत करून यश संपादन करावे.असे आवाहन केले. याप्रसंगी गणेश लोखंडे, माणिक भिसे, प्रदीप देशमुख,लक्ष्मण कांबळे, देविदास डांगे, सुर्यकांत मालीपाटील,लक्ष्मण भिसे,अमजद खान पठाण,यांच्यासह अनेक जन उपस्थित होते.