दांडी बहादूर काम चुकार ग्रामसेवकाच्या नाकर्तेपणामुळे गावातील रस्त्यावरील घाण सांडपाण्याचा प्रश्न अजूनही कायम -NNL

हिमायतनगर,आनंदराव जळपते। तालुक्यातील मौजे पोटा बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेलं नामांकित गाव या गावातील सार्वजनिक रस्त्यावर बऱ्याच दिवसापासून घाण सांडपाण्याचा स्तराव होत असल्याने रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना घाण पाण्याच्या दुर्गंधीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामविकास अधिकारी यांना वारंवार सूचना देऊन ग्रामपंचायतीला निवेदन सादर करून सुद्धा या गंभीर बाबीकडे ग्रामसेवकाचा काना डोळा व दुर्लक्ष केल्यामुळे   ग्राम विकास अधिकारी यांचा नाकर्तेपणा त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता नागरीकात आता  वर्तवली  जात आहे.

ग्रामविकास अधिकारी यांच्या  आडमुठ्या धोरणामुळे गावकऱ्यांना घाणीच्या साम्राज्याचा सामना करावा लागत आहे वारंवार ग्रामविकास अधिकारी जेकीलवाड यांना सूचना निवेदन देऊन  देखील  गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत याचा अर्थ ग्राम विकास अधिकारी यांच्या पाठीशी राजकीय वलय ‌आहे काय  असा संभ्रम नागरिकांत  निर्माण होतो आहे.

कारण त्यांच्य नेहमी कानावर  टाकुन  सुध्दा  गावाच्या मुलभूत सुख सुविधा कडे त्यांचे साफ दुर्लक्ष आहे एक प्रकारचा हलगर्जीपणाच  म्हणावा लागेल ...................म्हणून पोटा बुद्रुक हे गाव सुजलाम सुफलाम स्वच्छते पासून कोसो दूर राहतो की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकात निर्माण झाला आहे.. घाणीच्या साम्राज्यामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या गंभीर आजारांना  सामोरे जावं लागत आहे गावातील नागरीक बालकिशन आराध्य यांच्या घरासमोरील रस्त्यावर घाण सांडपाणी येत असून त्यांना या सांडपाण्याचा भयंकर त्रास होत आहे.

ही बाब प स हिमायतनगर येथील  गटविकास अधिकारी यांना देखील कल्पना आहे. तसेच या बाबतीत तक्रारीच निवेदन दिले आहे मात्र संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याला जाग आलीच नाही.  चालढकलपणा करून आतापर्यंत रस्त्यावर असणाऱ्या घाणीच्या सांडपाण्याची विलेवाट काय ग्रामसेवकांनी लावलीच नाही. त्यामुळे दांडी बहादूर काम चुकार कारणे सांगू मुख्यालय न राहणाऱ्या ग्रामसेवका  बद्दल नागरिकात  रोष  व्यक्त होताना दिसत आहे.

घाणीच्या पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायत स्तरावर  ग्रामपंचायतीच्या आधिनियमा प्रमाणे रस्त्यावर वाहणाऱ्  पाणी नालीत सोडण्याची व्यवस्था करून रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावावा  असे निवेदन जिल्हा अधिकारी साहेब नांदेड . मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद नांदेड यांना दिनांक 28 9 2022 रोजी निवेदन देण्यात आले    पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नसेल  न्या मिळत नसेल तर मी अर्जदार बालकिशन आराध्य लोकशाही पद्धतीने  ‌ पंचायत समिती हिमायतनगर येथील गट विकास अधिकारी कार्यालयासमोर येणाऱ्या काळात  आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी