नविन नांदेड। धनेगाव येथील रहिवाशी डॉ.कुं.पुजा मनोहर शिंदे यांनी दंत वैद्यकीय क्षेत्राचा अंतिम वर्षात विशेष प्राविण्य मध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल धनेगाव ग्रामस्थ यांच्या सह परिवारातील सदस्य यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
वाजेगाव जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांच्या कन्या व ग्रामपंचायत कार्यालय धनेगाव येथील ऊपसंरपच असलेल्या कुं. डॉ.पुजा मनोहर शिंदे या श्री.गुरदत प्रतिषठाण नांदेड संचलित नांदेड रूलर डेटंल महाविद्यालय व रिसर्च सेंटर नांदेड येथे दंत वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊन तिनं वर्षांचा दंत वैद्यकीय पदवी मध्ये विशेष प्राविण्य मिळवीत उत्तीर्ण झाली आहे, तीच्या या यशाबद्दल धनेगाव ग्रामपंचायत संरपच पिंटू पाटील शिंदे , माजी पंचायत समिती सदस्य भुंजगराव भालके, यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य धनेगाव व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत,या यशाचे श्रेय डॉ.पुजा शिंदे यांनी महाविद्यालयातील शिक्षक वृंद व आई वडील यांना दिले आहे.