नांदेड| शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाकडून ३०/०९/२०२२ रोजी खुनाच्या गुन्हयातील आरोपीतांना तात्काळ अटक करून चांगली कामगिरी केली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने जारी केली आहे.
दि. ०८/१०/२०२२ रोजी फिर्यादी राहुल सोपानराव भिसे वय ४५ वर्षे रा. आंबेडकर नगर नांदेड यांनी तकार दिली होती की, दि. ३०/०९/२०२२ रोजी रात्री ०७.३० वाजताच्या सुमारास माझा भाउ यशपाल सोपानराव भिसे वय ४० वर्षे रा.आंबेडकर नगर नांदेड हा घराबाहेर उभा असतांना आमचे घरा शेजारी राहणारा अमोल अनंदराव गोबंदे वय २९ वर्षे व त्याचे सोबत १) किरण मारोती खंडेजोड, २) आनंद किशनराव गोवंदे, ३) शिल्पा अमोल गोवंदे, ४) वंदना आनंद गोवंदे, ५) चांदणी आनंद खंडेजोड सर्व रा. आंबेडकर नगर, यांनी कचरा व सांडपाणी टाकण्याचे कारणावरून धारदार शस्त्राने भावावर वार करून त्याचा खुन केला. अश्या तकारी वरून पोलीस स्टेशन शिवाजी नगर येथे नांदेड येथे गु.र.नं ३६३/२०२२ कलम ३०२, १४३, १४८, १४९ भा.द.वि सह कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपीतांचा तात्काळ शोध घेवून आरोपी नामे १ अमोल आनंदराव गोवंदे , २. किरण मारोती खंडेजोड , ३. आनंद किशनराव गोवंदे, २. शिल्पा अमोल गोवंदे, ५. वंदना आनंद गोवंदे, ६. चांदणी आनंद खंडेजोड सर्व रा. आंबेडकर नगर, नांदेड यांना ताब्यात घेवून अटक करून चांगली कामगीरी केली आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक नांदेड, मारी प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, पोलीस निरीक्षक शिवाजीनगर डॉ.नितीन काशीकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पथक प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक आर. व्ही. वाहुळे, पोलीस उप निरीक्षक मिलींद सोनकांबळे, व अमलदार शेख इब्राहीम, दिलीप राठोड, रविशंकर बामणे, देविसिंग सिंगल, शेख अझहर, दत्ता वडजे यांनी पार पाडली.