पुणे। 'भारतीय चलनावर गणपती, लक्ष्मीचे फोटो छापा म्हणजे भारताची अर्थव्यवस्था उंचावेल ',असे अंधश्रध्दा पसरविणारे वक्तव्य करून अंधश्रध्देला चालना देण्याचे घाट घातल्याकारणाने दिल्ली चे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पार्टी चे राष्ट्रिय अध्यक्ष अरविन्द केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपच्या वतीने पोलिसांना देण्यात आले आहे.
इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम इसाक बागवान,अब्दुल बागवान,राजू सय्यद,रहिम शेख,रियाज मुल्ला, गफुर सैय्यद, रियाज मोमीन, आयूब मणियार, असलम पठाण, रियाज फिटर, मुन्ना अन्सारी, तौफिक अन्सारी यांनी कोंढवा पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटिल यांना दिले. सुशिक्षीत म्हणविणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविन्द केजरीवाल यांनी राज्या -राज्यात धार्मिक भा्वना भडकावण्याचा प्रयत्न केल्याबाबत संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.