उस्माननगर, माणिक भिसे। काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जिल्ह्यात ७ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. या यात्रेची सुरवात जिल्ह्यातील देलगूर येथील मदनूर नाक्या जवळून जिल्ह्यात आगमन होणार असल्याचे कंधार पंचायत समितीच्या सभापती तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.लक्ष्मीबाई व्यंकटराव पाटील घोरबांड , यांनी सांगितले . या यात्रेस नदिड जिल्ह्यासह माझ्या मतदासंघातील जास्तीत जास्त कार्यकर्ते, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सौ.लक्ष्मीबाई घोरबांड यांनी केले आहे.
भारतात सात सप्टेंबर पासून सुरु झालेली हि भारत जोड़ा पदयात्रा केरळ, तामिळनाडू असा प्रवास करत आता कर्नाटक मध्ये आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या पन्नास हजारांपासून दीड ते दोन लाखांपर्यंत आहे. देशात चैतण्यमय वातावरण निर्माण होत आहे. आजपर्यंत तीन हजार किलोमीटरच्या वर पायी प्रवास झाला आहे. हि पदयात्रा जगाच्या पाठीवर आता पर्यंत कोणीही काढलेली नाही. अशी ही पदयात्रा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात ७ नोव्हेंबर पासून सुरु होणार असून नांदेड जिल्ह्यातील देगलूर मदनापुर नाका येथे तिचे आगमन होणार आहे.
त्यानंतर आठ नोव्हेंबर २०१२ सकाळी सहा वाजता देगलूर येथून पदयात्रा वाशीम, अकोला, बुलढाणा सुरुवात होणार आहे त्यानंतर आठ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच प्रवास वाजता भोपाळा येथे सभा दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता शंकर नगर येथून पदयात्रा प्रारंभ होणार आहे व दुपारी तीन वाजता नायगाव येथील कुसुम लॉन्स येथे पदयात्रा व सायंकाळी साडेपाच वाजता कृष्णूर येथील एमआय.डीसी येथे सभा व दिनांक १० नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता कापशी गुंफा येथून प्रारंभ दुपारी तीन वाजता नांदेड मध्ये आगमन व नांदेड येथील नवा माँढा मैदान येथे जाहीर सभा होणार आहे.
त्यानंतर ही पदयात्रा दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी हिंगोली मार्गे असा महाराष्ट्रात २८१ किलोमीटरचा प्रवास करणार असल्याचे यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यासह लोहा कंधार तालुक्यातील सर्व कार्यकत्यांनी , नागरिकांनी या भारत जोडो यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन नांदेड जिल्ह्यात चैतण्यमय वातावरण निर्माण करावे असे आव्हान कंधार पंचायत समितीच्या माजी सभापती, सामाजिक कार्यकर्त्या सौ. लक्ष्मीबाई व्यंकटराव पाटील घोरबांड यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केले.