हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव शहराच्या एस टी बस्थनाकात भावबीजेच्या दिवशी दोन भामट्यांनी एका जेष्ठ नागरिका़ला लुटले असुन या बाबतीत हदगाव पोलिसांनी या बाबतीत गुन्हा दाखल केल्याचे समजते.
या बाबतीत मिळालेली माहीती अशी की, दि २६ आक्टोबर रोजी दादाराव विश्वानाथराव देवसरकर (७८) रा लिगापुर ता हदगाव हे नादेड येथुन प्रवास करुन हदगाव बस्थानकात उतरले त्या ठिकाणी दोन जण त्यांच्या जवळ आले, आणि आम्ही पोलिस निरक्षक आहोत आस सागुन तुमची बँग तपासायची आहे. अस सागुन बँग मधील १०हजार रु.व ५ग्रँमची सोन्याची अंगठी असा एकुण ६०हजार ऐवज घेवुन त्यांची फसवणूक केली. ते बोगस पोलिस लगेच निघून गेले या प्रक्रणी हदगाव पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. पण दोन वर्षात किमान तीन ते चार हदगाव पोलिस स्टेशनला पोलिस निरक्षक बदलुन गेले आहे या मुळे पोलिसाचे नियंत्रण दिसुन येत नाही.
शहरात एस टी बस्थानक शाळा महाविद्यालये परिसर या बाबतीत अनेकानी विनंतीपुर्वक पोलिसाच्या वरिष्ठ आधिका-याना किमान अश्या ठिकाणी राऊड तरी मारायच्या तरी स्थानिक पोलिसाना सुचना दिया या नागरिकांच्या व पालकाच्या सुचनेकडे लक्ष देण्यात येत नाही. नागरिक व पोलिस याचे काही समन्वयचा अभाव यामुळे चोरट्यांना भामट्याना व अवैध धंदेवाल्यावर पोलिसांचे वचक आसल्याचे दिसुन येत नाही ही वस्तुस्थिती आहे. आता नव्यानेच रुजु झालेले पोलिस अधिक्षक यांनी वारंवार पोलिस निरक्षक हदगाव पोलिस स्टेशानला का बदलण्यात येते. या बाबतीत सखोल माहीती घेवून कायमस्वरुपी हदगाव पोलिस स्टेशनला देतील अशी अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करित आहे.