नांदेड| जिल्हा प्रशासन, महापालिका, गुरुव्दारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक समितीच्या वतीने आयोजित दिवाळी पहाटचा शानदार समारोप वसंत बहार या कार्यक्रमाने झाला. नांदेडच्या सर्वच स्थानिक कलावंतांनी एकापेक्षा एक सरस गिते सादर करुन उपस्थित हजारो प्रेक्षकांची मने जिंकली.
दिवाळी-पाडवा पहाट या कार्यक्रमात वसंत प्रभू, वसंत देसाई आणि वसंत पवार या तीन दिग्गज संगीत तज्ज्ञांच्या गितावर आधारीत वसंत बहार हा कार्यक्रम भक्तीगिते, भावगिते, लोकगिते आणि लावण्या आदी गितांचे सादर करुन बंदाघाटावर संपन्न झाला. पहाटे सहा वाजता सुरु झालेल्या या कार्यक्रमाला हजारो प्रेक्षकांनी हजेरी लावून दाद दिली. अॅड.गजानन पिंपरखेडे यांच्या संकल्पना व निवेदनातून तसेच पत्रकार विजय जोशी यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात नांदेडच्या सर्वच स्थानिक कलावंतांनी हम भी कुछ कम नही हे दाखवत उत्कृष्ट कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन आनंदी विकास आणि प्रमोद देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात घनश्याम सुंदरा या अपूर्वा कुलकर्णी आणि धनंजय वंâधारकर यांनी गायिलेल्या गितांनी झाली. त्यानंतर डॉ.कल्याणी जोशी हिने विठ्ठल तो आला आला, चाफा बोलेना, रिमझिम पाऊस पडे सारखा ही पारंपारिक गिते सादर केली. त्यानंतर पौर्णिमा कांबळे हिने तेरे सूर और मेरे गित, जिथे सागरा ही गिते सादर करुन रसिकांची वाहवा मिळविली. भाग्यश्री टोमके पाटील हिने किती पांडूरंगा वाहू आणि कस काय पाटील बरं हाय का हे दोन बहारदार गिते सादर केली. अपूर्वा कुलकर्णी हिने बोले रे पपीहारा, गाव झाला जागा आता ही गिते सादर केली.
ब्रम्हा कुलकर्णी आणि अपूर्वा कुलकर्णी सप्रेम नमस्कार तसेच ब्रम्हा कुलकर्णी यांनी एकवार पंखावरुनी हे गीत सादर केले. नांदेडचे उभरते संगीतकार लक्ष्मीकांत रवंदे आणि आसावरी जोशी (रवंदे) यांनी सांगा या वेडीला हे व्दंद गीत सादर करुन रसिकांचा उत्स्फूर्त मिळविला. त्यानंतर रवंदे यांनी सुंदरा मनामध्ये भरली हे गीत सादर केले. धनंजय कंधारकर यांनी नारायणा, रमा रमणा हे सुंदर गीत सादर केले. या सर्व कार्यक्रमात बहार आणली ही आसावरी रवंदे (जोशी) या प्रख्यात गायिकेने. तिने गायिलेल्या गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, फड सांभाळ तुNयाला गं आला, लटपट लटपट तुझं चालनं, सोळावं वरीसं धोक्याचं या उडत्या चालीवरच्या लावण्या व पारंपारिक गितांनी आसावरीनी धमाल करुन टाकली.
विजय जोशी यांनी घनघन माला नभी दाटल्या हे गीत सादर करुन रसिकांची वाहवा मिळविली. शेवटी ऐ मालिक तेरे बंदे हम या सामूहिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला संगीतसाथ राजू जगधने, पंकज शिरभाते, सुनील लांबटिळे, चिन्मय मठपती, अमित निर्मल, सुभाष जोगदंड, जगदीश व्यवहारे यांनी केली. वसंत प्रभू, वसंत पवार, वसंत देसाई यांच्या जीवनातील वेगवेगळ्या घटनाक्रमाचा उत्कृष्ट उल्लेख आपल्या निवेदनात अॅड. गजानन पिंपरखेडे यांनी करुन उत्कृष्ट निवेदन केले. नागरी सांस्कृतिक समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.