राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विद्यापीठ - प्रा.डॉ.शिवानंद अडकिणे -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर।
विद्यार्थी हा समाजातील अविभाज्य घटक आहे . समाजात सामाजिक भान आणि मान मिळवून देण्यासाठी शिक्षण पूर्ण करावे लागते . शिक्षण काही पुस्तकातून तर काही अनुभवातून शिकता येते . हीच भावना निर्माण करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय , मुखेड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्य करीत आहे . दि.24 सप्टेंबर हा दिवस " राष्ट्रीय सेवा योजना दिवस " म्हणून साजरा करण्यात आला . राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कार्य करणारे विद्यापीठ आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे यांनी केले .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , प्रमुख पाहुणे तोष्णीवाल महाविद्यालय , सेनगावचे प्रा.डॉ. एस.एस.अग्रवाल , डॉ. डी.एस.धारवाडकर , डॉ. जी.पी.भालेराव आणि व्यासपीठावर रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. सी.एन.एकलारे हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका कु.श्रध्दा गेडेवाड आभार प्रदर्शन स्वयंसेवक सौरभ पाटील तर प्रास्ताविक प्रा.डॉ. सी.एन. एकलारे यांनी केले . महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला . विजेता स्पर्धकाला पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले .

 राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून रांगोळी , चित्रकला , वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेसाठी आपत्ती व्यवस्थापन , पर्यावरण जनजागृती , व्यसनमुक्ती , बेटी बचाव बेटी पढाव हे शीर्षक ठरवण्यात आले होते . रांगोळी स्पर्धेत वरिष्ठ गटातून सर्वप्रथम कु.वैष्णवी पद्माकर कुलकर्णी , द्वितीय कु. सुप्रिया संजय कांबळे , तृतीय क्रमांक कु.मुस्कान महेमुद सय्यद , कु.दर्शना शेषराव बनसोडे आणि कनिष्ठ गटातील कु.आदिती भालेराव , द्वितीय सचिन नवेकर , तृतीय क्रमांक कु.दिपाली कोंडामंगले , अविनाश नवेकर यांना यश मिळाले . 

वक्तृत्व स्पर्धेचे विषय कैफियत शेतकऱ्यांची आणि पर्यावरण संरक्षण काळाची गरज हे विषय होते . यामध्ये सर्वप्रथम कु.आकांक्षा शिंदे , द्वितीय कु.रोहिणी किरकण , तृतीय कु.आदिती भालेराव यांनी क्रमांक पटकावला आहे . यशवंताचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . निबंध आणि चित्रकलेमध्ये अधिक संख्येने सहभागी झाल्यामुळे पुढील काळात निकाल जाहीर करण्यात येणार आहे . सर्वच स्पर्धेत एकुण १२३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .

प्रमुख पाहुणे डॉ. धारवाडकर यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजना हे माणसाला माणूस व्हायला शिकवते . स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव व ओळख करून देणारे एकमेव व्यासपीठ एन.एस.एस.आहे . रोसेयो चा प्रत्येक तरुण हा मनातील विचार सत्यात उतरवत असतो , फक्त मात्र त्यांना संधी उपलब्ध करून देण्याची गरज असते असे विचार व्यक्त केले . अध्यक्षीय भाषणात डॉ. अडकिणे यांनी दिशाहीन युवकांना दिशा देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करत असते . 

शिक्षणाबरोबरच सेवाभाव मनात बाळगून जगत राहिले तर स्वतःचा आणि समाजाचा कायापालट होत असतो . या संधीचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यावा . प्रत्येक स्पर्धेत यशस्वी आणि सहभागी होणारे आत्मविश्वासाने सामोरे जावे . प्रयत्नशील राहिले तर यश नक्कीच मिळते असे विचार मांडले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. बी.एस.केंद्रे , प्रा.डॉ. एम.पी.देशपांडे , प्रा.डॉ. संतोष शेंबाळे , प्रा.अशोक कुमनाळे , राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी