नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे प्रथमच दिवाळी निमित्ताने लक्ष्मी पुजनचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी विधीवत पुजन केले.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सहा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत दिपावली सणाच्या निमित्ताने लक्ष्मीपूजन २४ आक्टोबंर रोजी आयोजन करण्यात आले होते, सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे प्रथमच दिवाळी निमित्ताने लक्ष्मी पुजन सोहळा आयोजन २४ आक्टोबंर रोखपाल विभागात या लक्ष्मी पुजन आयोजित केले होते.
गुरू किरण चेरेकर यांच्या ऊपसिथीत विधीवत मंत्रोपचार करण्यात आले होते तर अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी विधीवत पूजा करून महाआरती केली, यावेळी दिपवाली निमित्ताने कार्यालया मध्ये सजावट करण्यात आली होती. यावेळी सिडको साहयक आयुक्त डॉ.रईसौधदीन व कार्यालय अधीक्षक विलास गजभारे, करनिक्षक दिपक पाटील, सुधीर बैस,सुदाम थोरात यांनी ऊपसिथीत मान्यवरांच्ये स्वागत केले. यावेळी साहयक आयुक्त संजय जाधव, रमेश चावरे, रावण सोनसळे, यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती.
प्रथमच दिवाळी सणाच्या निमित्ताने होत असलेल्या महापुजन निमित्ताने सर्व कर्मचाऱ्यां मध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते, यावेळी ऊपसिथीत मान्यवरांनी दिवाळी निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी झोन कार्यालय अंतर्गत स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे, अरजृन बांगडी,बालाजी लोहगावकर, मारोती सांरग, राजपाल सिंग जक्रीवाले,संदीप धोंडगे, शाम आरकुले,गिराम, पवळे ,मदनसिंह बैस, यांच्या सह कार्यालयीन कर्मचारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांच्यी उपस्थिती होती.