नवीन नांदेड। सिडको भागातील काँग्रेस पक्षाचे सक्रिय युवा कार्यकर्ते प्रसेनजित वाघमारे यांना, स्वतःच्या वाढदिवस कार्यक्रमाचा खर्च टाळून रुग्णसेवेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहान आ. हंबर्डे यांनी केले होते. याच आवाहानाला प्रतिसाद देत प्रसेनजित वाघमारे यांनी सोमवार (ता.२४) रोजी विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला, आ. मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते, दोन व्हीलचेअर भेट स्वरूपात देवून वाढदिवसाचा आनंद द्विगुनीत केला आहे.
सामाजिक उपक्रम राबवून समाज सेवेत सक्रिय असणारे सिडको येथील काँग्रेस पक्षाचे सक्रिय युवा कार्यकर्ते प्रसेनजित वाघमारे यांचा सोमवार (ता.२४) रोजी वाढदिवस असल्याने, प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही विविध उपक्रम आयोजित करत असल्याचे वाघमारे यांनी आ.मोहनराव हंबर्डे यांना कळवत उपस्थित राहणाची विनंती केली. यावेळी रुग्णसेवा होईल व शासकीय आरोग्य यंत्रणेलाही मदत होईल असा उपक्रम राबविण्याच्या सुचना आ. मोहनराव हंबर्डे यांनी प्रसेनजित वाघमारे यांना दिल्या.
वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च टाळुन विष्णूपुरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय येथील अतिदक्षता विभागाला आ.मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते, सोमवार (ता.२४) रोजी दोन व्हीलचेअर भेट देत वाढदिवसाचा आनंद द्विगूनीत केला आहे. रुग्णसेवेची चळवळ वाढवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आ. मोहनराव हंबर्डे यांनी करत प्रसेनजित वाघमारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत उपक्रमाचे कौतुक केले,यावेळी निखिलेश देशमुख, सम्राट आढाव,अरविंद वाठोरे, शुभम खंदारे,अमोल जिव्हाळे यांच्यासह डॉ. प्रितम कसबे व रुग्णालयाचा सर्व स्टाफ उपस्थित होता.