नांदेड। दि.30 ऑक्टोंबर रोजी शासकीय विश्रामगृह ,नांदेड येथे कलाल गौड,तेलंग समाजाच्या उपवधू वर परिचय मेळाव्या संदर्भात बैठक मा.गोविंद बाबागौड पाटील कोंडलवार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पार पडली.
या बैठकीला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.बैठकीचे प्रस्ताविक राष्ट्रीय कलाल गौड युवा संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष सुनील अनंतवार यांनी केले. कलाल गौड,तेलंग समाजाचा उप वधू वर राज्यस्तरीय परिचय मेळावा हे लवकरच मोठ्या थाटामाटात नांदेड येथे घेण्यात येणार आहे.
या संदर्भात पूर्वनियोजन करण्यासाठी या बैठकीत दत्तात्रय अनंतवार,कैलास गोडसे, कॉ. उज्वला पडलवार,लक्ष्मीकांत सुंदरगिरवार, रमेश घंटलवार, बाबाराव नंदेवार,गंगाधर नंदेवाड, पांडुरंग पाटील,गणेश नंदेवार, उध्दवराव बम्पलवार,संतोष मारकवार,रामेश्वर गोडसे,विजय बत्तीनवार, गणेश नंदेवार,रमेश कोंडलवार, धनंजय कन्नलवार,अशोक पडलवार यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले व राज्यस्तरीय होणाऱ्या मेळाव्यासाठी आम्ही योगदान देणार असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले अनेक विषयावर सविस्तर चर्चा झाली असून लवकरच फेब्रुवारी 2023 ला एक तारीख निश्चित करू असे मत बैठकीत सर्वानुमते व्यक्त करण्यात आले. आजच्या धावपळीच्या युगामध्ये समाजामध्ये एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होत आहे.
ग्रामीण भाग तथा शहरी भागामध्ये उच्चशिक्षित मुलं मुली असून सुद्धा योग्य जोडीदार मिळणे अवघड झाले आहे समाजाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी आणि समाजात विचारांची देवाण-घेवाण वाढवून समाजाने एकत्र येणे गरजेचे असून भविष्यात असे वेगवेगळे कार्यक्रम समाजाच्या वतीने घेत राहिले तर समाज एकत्र राहील राज्यामध्ये कलाल गौड ,तेलंग समाज मोठ्या संख्येने असून वेगवेगळ्या शासकीय, राजकीय, सामाजिक अशा स्तरावर काम करतो समाजामध्ये उच्चशिक्षित तरुण पिढी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.
समाजाला नवी दिशा देण्यासाठी समाजाच्या उन्नतीसाठी असे अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत्या काळात नक्कीच होतील परंतु आत्ता मुख्य अजेंडा राज्यस्तरीय उपवधू वर परिचय मेळावा हा लवकरच मोठ्या थाटामाटात नांदेड येतं घेण्याचे निश्चित झाले असून या बैठकीसाठी भगवान संपतवार, बालाजी रायपलवार,माणिक बुरेवार, ज्ञानेश्वर ईबीतवार,शंकर रायपलवार, शिवाजी ईबीतवार,सुमित गोडसे,मारोती चंदनवार आणि जिल्ह्यातील इतर समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.