हदगाव, शे.चांदपाशा| नांदेडमध्ये शेतकऱ्याच्या सोयाबीन गंजीला अज्ञाताकडून आग लागवण्यात आली आहे. हदगाव तालुक्यातील मौजे वडगाव इथे हा गंभीर प्रकार घडला असून, नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्याच अगोदरच परतीच्या पावसाने मोठे नुकसान झालं आहे.
यंदा खरीप हंगामात कोवळी पिके असताना अतिवृष्टी झाली. त्यानंतर काही दिवस उघड झाल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. पिके वाऱ्यावर डोलताना पुन्हा सतत तीन वेळा अतिवृष्टी झाली, यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड मुकं झाले आहे. या संकटातून वाचलेले 4 /5 एक्कर शेतातील सोयाबीनची काढणी करून वडगाव येथील शेतकरी गजानन ताटीकोंडलवार यांनी शेतातील तुरीच्या रानात सोयाबीनचा ढग लावला होता.
या ढगाला अज्ञात व्यक्तीने जाळ लावून फुकून दिले आहे. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध तामसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी हाताला जे सोयाबीन लागल ते जमा करुन ठेवलं असताना त्यालाही आग लावण्याचं काम अज्ञातांकडून केलं जात आहे हे या घटनेवरून स्पष्ट होते आहे.