शहरातील मोकाट कुत्रे,गाई, कटाळ्यांसह गाढवांचा मुख्य रस्त्यावर सैराट धुमांकूळ
मोकाट जनावरांना नगर परिषदेच्या कोंढवाड्यात बंदिस्त करण्याची शहरातील नागरिकांची मागणी
मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट कुत्रे,गाई - वासरे , व विशेष करून गाढव आणी कटाळ्यांचा शहरातील प्रवासी वाहण धारकांना व पदयात्री नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
यामुळे शहरातील नागरिकांच्या अपघातांची संख्या वाढली आहे. तर काही ठिकाणी गाई वासरांचाही अपघात होतांना दिसत आहे. शहरातील नगर परिषद प्रशासनाकडुन याकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे.नगरपरिषद प्रशासनाने या मोकाट जनावरांना कोंठवाड्यात बंदिस्त करावे अशी शहरातील नागरिकांनी दैनिक गाववालाच्या प्रतिनिधींसी बोलतांना व्यक्त केली आहे.
या गंभीर बाबीकडे मुखेड नगर परिषदेचे प्रशासकीय नगराध्यक्ष तथा देगलुरचे सहायक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांनी तात्काळ लक्ष घालून मुखेड शहरातील मोकाट जनावरांना कोंठवाड्यात बंदिस्त करावे अशी शहरातील नागरिकांतुन जोर धरू लागली आहे.