२० ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर ओसरणार :सिद्धेश्वर मारटकर
पुणे। पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी २४ ऑक्टोबरपर्यंत मोठा पाऊस होईल मात्र २० ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसेल, असे भाकित पुण्यातील ज्योतिष अभ्यासक व ज्योतिषज्ञान ' मासिकाचे संपादक सिध्देश्वर मारटकर यांनी वर्तवले आहे.२४ ऑकटोबर पर्यंतचा हा काळ अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत होण्याचा , विमान दुर्घटना, भूकंप असा असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी,असे आवाहन मारटकर यांनी केले आहे.
२६ सप्टेंबरच्या अमांत कुंडली चा परिणाम २४ ऑक्टोबरच्या अमांत कुंडली पर्यंत राहू शकतो. त्यानुसार पावसाचा प्रभाव राहणार आहे. मेदिनीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंडली मांडून मारटकर यांनी हे भविष्य वर्तवले आहे. एक वर्षापूर्वी ते 'ज्योतिष ज्ञान ' दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले आहे सिद्धेश्वर मारटकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. २४ ऑकटोबर पर्यंतचा हा काळ अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत होण्याचा,विमान दुर्घटना, भूकंप असा असल्याचे भाकित वर्तवले होते, त्यानुसार अतिवृष्टी तसेच केदारनाथ ची हेलिकॉप्टर दुर्घटना अनुभवास येत आहे,असेही मारटकर यांनी सांगीतले