नांदेड। महाराष्ट्रातील नुकतेच सीईटी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बी.एड. परीक्षा प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन दि. 12 /10 /022 पर्यंत मुदत दिली होती .पण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी, ढगाळ वातावरण व सतत पाऊस चालू असल्यामुळे त्या भागात इंटरनेट नेटवर्क नसल्यामुळे ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांना बी.एड. सिईटी उत्तीर्ण असून सुद्धा रजिस्ट्रेशन करता न आल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार आहे. या साठी बी.एड. सीईटी रजिस्ट्रेशन ची मुदत किमान पाच दिवस अधिक वाढवावी. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल. त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल या आशयाची मागणी भारतीय जनता पार्टी वि.जा.भ.ज. आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य. शंकरराव राठोड यांनी निवेदनाद्वारे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र जी फडणवीस उपमुख्यमंत्री , चंद्रकांत दादा पाटील उच्च शिक्षण मंत्री, कुलगुरु , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, जिल्हाधिकारी नांदेड व जिल्हाधिकारी हिंगोली यांना मागणी केली आहे.त्यांच्यासोबत प्रवीण जी साले, भा. ज.पा. महानगराध्यक्ष, दिलीप भाऊ ठाकूर , प्रा.मिलिंद वाघमारे व भारतीय जनता पार्टी नांदेड चे इतर कार्यकर्ते सोबत होते.