नवीन नांदेड। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय, नांदेड च्या वतीने दि. १९आक्टोंबर रोजी लेबर कॉलनी येथे गटस्तरीय लोकनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत ललीत कला भवन नांदेड यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे, या स्पर्धेत एकूण १० संघानी सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेचे उद्घाटन जेष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अशोक तेरकर, कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस,अशोक डुम्पलवार भास्कर मोरे स्पर्धेची परीक्षा डॉ.सानवी जेठवाणी , शुभम बिरकुरे, संगीता ढाणवाडी, पत्रकार दिगंबर शिंदे,केंद्र संचालक विश्वनाथ साखरे , गजानन भोसीकर , विलास मेडके यांच्या हस्ते करण्यात आले. विविध १० सहभागी कलावंत सहभागी झाले होते. यामध्ये प्रथम क्रमांक ललित कला भवन नांदेड, द्वितीय कामगार कल्याण केंद्र मिलगेट व तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र सिडको यांनी पटकावला.
मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला संचलन केंद्र संचालक विश्वनाथ साखरे तर आभार गजानन भोसीकर यांनी मांडले या स्पर्धा यशस्वी होण्याकरिता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय नांदेड येथील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.