प्रवासी वाहतूक मोटार वाहन कायद्यातील तरतुदी नुसारच करा -NNL

अन्यथा दंडात्मक कारवाई - प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत


नांदेड|
खाजगी बसेसद्वारे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली असून गेल्या पाच दिवसात 31 वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण लक्षात घेता वाहतुकीच्या नियमाचे काटेकोर पालन हे सर्वच वाहन चालकांकडून अपेक्षित आहे. यात जर कोणी दोषी आढळला तर त्यांच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी दिला. 

सर्व खाजगी बस वाहन धारकांना मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसारच प्रवासी वाहतुक करण्याचे आदेश दिलेले आहेत. प्रवाशांनीही अधिकृत प्रवासी वाहनातून प्रवास केला पाहिजे. विना परवाना वाहतुक, टप्पा वाहतुक, अवैध माल वाहतुक, योग्यता प्रमाणपत्र नसणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट नसणे, वाहनामध्ये बेकायदेशीर बदल करणे हे परिवहन कायद्यात मोडत नाही. याचबरोबर क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतुक करणे, अग्निक्षमन यंत्रणा नसणे, आपतकालीन दरवाजा नसणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. अशा वाहनांविरुध्द कारवाई करण्यात येईल, याची नोंद खाजगी बस वाहन धारकांनी घ्यावी असे  प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी