नविन नांदेड। नांदेडच्या 'सिडको' वसाहतीतीअंतर्गत असलेल्या एनडी-१२०, 'नालंदा' बुध्द विहार परिसरातील रहिवासी तथा नांदेडच्या इतवारा पोस्ट कार्यालयातील कर्मचारी राजू किशनराव बनसोडे (वय-५६ वर्षे) यांचे २० ऑक्टोबर रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
दिवंगत राजू बनसोडे यांच्या पार्थिव देहावर गुरूवार दि. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता नवीन नांदेड भागातील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक अविवाहित मुलगा, एक मुलगी, बहीण व मेहुणा असा परिवार आहे. मितभाषी तसेच सर्व समाजबांधवांच्या सुखदुःखात नेहमीच हिरीरीने सहभागी राहणाऱ्या राजू बनसोडे लातूरकर यांच्या अकाली निधनाबद्दल सिडको- हडको परिसरासह नांदेडच्या इतवारा भागातील सहकारी व सर्व मित्रमंडळींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.