हिमायतनगर, शंकर बरडे। हिमायतनगर तालुक्यातील दुधड/वाळकेवाडी येथे असलेल्या शासकीय आश्रम शाळेत अतिशय नियोजनबद्द सर्व खेळ पार पडले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा दुधड येथे शालेय केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धाला 27 सप्टेंबर पासून सुरवात झाली होती..
या मध्ये क्रीडा व युवक संचालनालयाप्रमाणेच आदिवासी विकास विभागाकडून आश्रम शाळेतील 14 17, 19 या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रस्तर,प्रकल्पस्तर, विभागीयस्तर व राज्यस्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे . सदर खेळ प्रकारात सांघिक स्पर्धा जसे की, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, रिले तसेच मैदानी (वैयक्तिक) जसे की, धावणे 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 600 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर, 3000 मीटर, 5000 मीटर, लांब उडी, उंच उडी, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक याप्रकारच्या स्पर्धा घेण्यात येतील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. 22 एप्रिल, 2015 च्या शासन निर्णयान्वये आदिवासी विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तर शालेय क्रीडास्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना 25 वाढीव क्रीडा गुण देण्यात येतात. तसेच सदर स्पर्धेत पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत नोकरीसाठी ठेवलेल्या 5% आरक्षणाचा फायदा मिळतो...
आदिवासी समाजातील गरीब मुले कुठे तरी वर जाऊन आपले व आपल्या शाळेचे नाव नमःलौकिक व्हावं या हेतूने शासकीय आश्रम शाळा दुधड येथे क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या सुरवात..या प्रसंगी उपस्थित आयोजक शाळेचे मुख्याध्यापक चामे सर,क्रीडा मार्गदर्शक, विस्ताराधिकारी तथा पालक अधिकारी डोमशेणवार सर,क्रीडा शिक्षक सोनटक्के सर,चव्हाण सर, जगदाळे सर, शतलावड सर, मंगणाळे सर,निक्कम सर,सूर्यवंशी सर, राठोड सर, नाईक सर, आढाव सर, अगलावे सर, मनोहरे सर, आदित्य राठोड सर, जाधव सर, चिंतेवाड मॅडम, कानडे मॅडम, फुंदे सर अदी शिक्षण उपस्थित व सर्व गुरुजन वर्गांचं मोलाचं योगदान लाभले आहे ..तसेच धावत्या खेळाचे वर्णन शंकर बरडे यांनी केले..